Tuesday, November 19, 2024
Homeताज्या बातम्याकोरेगाव भीमा येथे चार अल्पवयीन शाळकरी मुलांचा भीषण अपघात,रस्त्यावर रक्ताचा सडा ,रक्ताने...

कोरेगाव भीमा येथे चार अल्पवयीन शाळकरी मुलांचा भीषण अपघात,रस्त्यावर रक्ताचा सडा ,रक्ताने भरला शाळेचा गणेवश ,रिक्षा 

अल्पवयीन मुलांच्या अपघाताने पालकांचे डोळे आता तरी उघडतील काय ?

 कोरेगाव भिमा – दिनांक ३ नोव्हेंबर

कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथील पुणे नगर महामार्गावर एका दुचाकीवर असणाऱ्या चार मुलांचा अपघात झाला असून एक तीन चाकी मालवाहतूक रिक्षा यांचा अपघात झाला यामध्ये चारही अल्पवयीन मुले जखमी झाल्याने पुणे नगर रस्त्यावर रक्तच रक्त सांडले होते,रिक्षाला रक्त लागले होते व दुचाकीची दुरावस्था झाली होती. यावेळी स्थानिक नागरिकांनी संबधित विद्यार्थ्यांना उपचारासाठी तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करत माणुसकीचे अनोखे दर्शन घडवले.

    कोरेगाव भीमा येथील अल्पवयीन विद्यार्थ्यांचा पुणे नगर महामार्गावर एका खाजगी शिक्षण संस्थेतील मुले दुपारी पुणे नगर रस्त्यावर दुपारच्या वेळी ३.१५ मिनिटांनी एक तीनचाकी रिक्षा व दुचाकी यांचा भीषण अपघात झाला यामध्ये शाळकरी अल्पवयीन मुले जखमी झाले .यावेळी नागरिकांनी संबधित विद्यार्थ्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करत उपचार सुरू केले.

चार अल्पवयीन शाळकरी मुलांचा भीषण अपघात,रस्त्यावर रक्ताचा सडा ,रक्ताने भरला शाळेचा गणेवश ,रिक्षावर रक्ताचे डाग पाहून पाहणाऱ्याच्या अंगावर काटा येत होता व एकच प्रश्न मुले कशी आहेत ? काही झालं नाही ना?  खूप लागलं असेल असा चिंताजनक प्रश्न विचारत होते यावरून सदर अपघाताची भीषणता व गंभीरता लक्षात येते.

  दोघांना चांगलीच दुखापत झाली आहे.एकाच्या चेहऱ्यावर बराचा मार लागून मोठा रक्तस्त्राव झाला असून अपघाताची माहिती मिळताच शाळा व्यवस्थापक व ग्रामस्थांनी तातडीने मदत करत मुलांना उपचार उपलब्ध करून दिले याबाबत शाळा व्यवस्थापनाने कडक भूमिका घेत पालकांना मुलांना वाहन न देण्याची सूचना केल्या असून असे आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

अल्पवयीन मुलांना गाडी देण्यास नाही म्हणायला शिका अन्यथा दुर्दैवाने शोक संदेश पाठवायची वेळ येऊ नये ??  यावेळी नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत असून अपघातावरून विद्यार्थ्यांना त्यांचे पालक गाडी देतात तरी कसे ? यावर कडक कार्यवाही व्हायला हवी तसेच पालकांना समज द्यायला हवी.तात्पुरता मुलाचा लाड पालकांना आयुष्यभर पश्र्चाताप करायला लावू शकतो. अल्पवयीन मुलांना गाडी देण्याचे टाळायला हवे.एकदा दुर्घटना घडून गेल्यावर शोक संदेश देण्यापेक्षा आता मुलांना वाईट वाटले तरी चालेल पण वाहन देऊ नये आजचा कठोर निर्णय उद्याचे दुःखद व शोक प्रसंग टाळेल याचे भान बाळगायला हवे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!