कोरेगाव भीमा – दिनांक ९ जुलै
कोरेगाव भीमा (ता.शिरूर)येथे आषाढी पालखी सोहळा संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी आकर्षक वेशभूषा. विठ्ठल – रुक्मिणी , राम लक्ष्मण सीतामाई, श्रीकृष्ण संत ज्ञानेश्वर महाराज , संत निवृत्ती महाराज, संत मुक्ताबाई, संत सोपान महाराज व इतर संतांचा वेश परिधान करत बाल रुपात अवघा दिंडी सोहळा फ्रेंड स्कूल मध्ये पाहायला मिळाला.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राजाराम ढेरंगे यांनी विद्यार्थ्यांनी हरीनाम आपल्या जीवनात उतरवत आयुष्याचे सोने करावे तसेच संस्थेचे सचिव दिलीप भोसले यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमा सोबत अध्यात्मिक संस्कार ही जीवनात उतरवले तर जीवनाची बाजी मारण्यात काहीच अवघड नाही, तर संस्थेचे संचालक शंकर गव्हाणे यांनी वारी हि आषाढी एकादशी पुरती मर्यादित नसून ती दैनंदिन जीवनात रोजच घडावी असा मूलमंत्र विद्यार्थ्यांना दिला.
मुख्याध्यापक एम. एन. हराळ पाटील यांनी विद्यार्थ्याना आषाढी एकादशीचे महत्व पटवून दिले. शाळेपासून दिंडी विठू नामाच्या गजरात वाजत गाजत ग्रामपंचायत कार्यालय कोरेगाव भिमा येथे येताच विद्यार्थ्यांनी फुगडी, भजन, व रिंगण करत कार्यक्रमाची शोभा वाढविली. शाळेचे शिक्षक वृंद यांनी शिस्तीचे पालन करीत कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. या कार्यक्रमास स्थानिक नागरिकांनीही सहभाग घेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष राजाराम ढेरंगे, उपाध्यक्ष प्रकाश खैरमोडे, सचिव दिलीप भोसले, संस्थेचे संचालक शंकर गव्हाणे, रामदास सव्वाशे, राजेंद्र गव्हाणे,मुख्याध्यापक व शाळेतील शिक्षक वृंद उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्र संचालन माधुरी गुंडाळ व सविता शिंदे मॅडम यांनी केले.