मागील ३० वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यात सरपंच अमोल गव्हाणे यांना यश
कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथील फरची ओढा लगत गव्हाणे वस्ती रस्त्याचे काम ग्राम पंचायत कोरेगाव भीमा यांच्या माध्यमातून सुरू असून येथील रस्त्याचे काम मागील ३० वर्षांपासून प्रलंबित होते.यासाठी येथील शेतकरी व ग्रामस्थांनी मोठी सहकार्याची व सामंजस्याची भूमिका घेत रस्त्याला येणाऱ्या अडचणींना दूर करत रस्ता पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणत सहकार्य करत असल्याची माहिती कोरेगाव भीमाचे सरपंच अमोल गव्हाणे यांनी दिली.
गव्हाणे वस्ती येथील शेतकरी ,नागरिक , विद्यार्थी व महिला भगिनी यांना पावसाळ्यात प्रवास करताना अत्यंत अडचणींचा सामना करत चिखल व ,खड्डे युक्त रस्त्यातून प्रवास करावा लागायचा , शेतकऱ्यांना दूध व इतर शेतमाल ने आण करताना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागायचे याबाबत मागील अनेक वर्षांपासून शेतकरी व नागरिक या रस्त्याच्या कामाची मागणी करत होते.
शेतकरी ग्रामस्थांच्या सुविधेसाठी सरपंच अमोल गव्हाणे यांनी रस्त्याच्या कामासाठी प्रयत्न केले यामध्ये त्यांना मोलाचे सहकार्य ग्रामपंचायत सदस्य जयश्री दिपक गव्हाणे, बबन गव्हाणे, दीपक गव्हाणे, प्रवीण गव्हाणे, दशरथ गव्हाणे, माजी उपसरपंच निलेश गव्हाणे, अविनाश देवकर ,संपत गव्हाणे , किरण गव्हाणे , अमोल श्रीधर गव्हाणे, सुरेश काळूराम गव्हाणे, संदिप नारायण गव्हाणे ,भाऊसाहेब आनंदराव गाडेकर ,साहेबराव गुरूजी गव्हाणे, अजय त्रिंबक गव्हाणे, सागर कैलास गव्हाणे व इतर नागरिकांचे मोलाचे सहकार्य मिळाले.