कोरेगाव भिमा – कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथे अवैध धंदयांचा सुळसुळाट झाला असून मटका, पत्यांचा क्लब दिवसाढवळ्या राजरोसपणे सुरू असून यावर कोणाचा अंकुश आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत असून यावर वरदहस्त नेमका आहे तरी कुणाचा??
कोरेगाव भीमा परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असून येथे मटका व पत्त्यांचा क्लब राजरोसपणे सुरू असून लाखो रुपयांची उधळण होत आहे पण येथील पोलीस प्रशासन नेमके करते तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.विशेष म्हणजे कोरेगाव भिमा येथील मुख्य चौकात पोलीस मदत केंद्र आहे येथे पोलीस कर्मचारी असतात आणि दुसरीकडे मटका व पत्त्यांचा क्लब राजरोसपणे सुरू आहे मग कायद्याचा धाक आहे की काय द्यायचं हा प्रकार सुरू आहे की काय ? असा संशय निर्माण होत आहे.
दिवसाढवळ्या पत्राशेड मारून चालणाऱ्या मटका व पत्त्यांचा क्लब यावर प्रशासन मेहेरबान आहे काय ? गोरगरिबांच्या संसाराची राखरांगोळी करणाऱ्या या अवैध धंद्याचा सुळसुळाट झाल्याने कायदा व सुव्यवस्था किती सक्षम काम करते यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
अवैध धंद्याचा गॉड फादर आहे तरी कोण ? सहाब है तो मुनकिन हैं अशी खात्रीच अवैध धंदे चालकांना मिळते की काय अशी शंका येत असून या धंद्यांचे मुळापासून उच्चाटन करण्यात येईल काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे.