आमदार अशोक पवार यांच्या सूचनेने व दैनिक स्वराज्य राष्ट्रच्या बातमीची दखल घेत काम सुरू
कोरेगाव भीमा – दिनांक ९ जानेवारी
कोरेगाव भीमा तालुका शिरूर ते पिंपळे जगताप येथील रस्त्याची अत्यंत दयनीय दुरावस्था झाली होती या रस्त्याच्या बाबतीत पीएमआरडी विभाग यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या तसेच याबाबत शिरूर हवेली तालुक्याचे मदत अशोक.पवार यांनी संबधित विभागाला पत्रव्यवहार करत तातडीने रस्त्याच्या कामाच्या दुरुस्तीबाबत सूचना केल्या होत्या यावर पीएमआरडीए विभागाने तातडीने प्रत्यक्ष स्थळ पाहणी करत पंचनामा केला व संबंधितांना तातडीने रस्ता दुरुस्त करण्याच्या सूचना केल्या.
कोरेगाव भीमा ते वढू बुद्रुक रस्त्याचे काम सुरू असल्याने चौफुला व चाकण यांना जोडणाऱ्या कोरेगाव भीमा ते पिंपळी जगताप रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत होती त्यामुळे रस्त्याच्या कामाला अडचणी निर्माण होत असूनही पीएमआरडी विभाग महानगर आयुक्त राहुल महिवाल ,मुख्य अभियंता अशोक भालकर , कार्यकारी अभियंता विजय कांडगावे ,उप अभियंता (से. नि.) सुभाष मोरे, क्षेत्रीय अभियंता अजिंक्य जगताप, उप जिल्हाधिकारी तथा महानगर आयुक्तांचे विशेष कार्य अधिकारी रामदास जगताप साहेब व इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी प्रयत्न केला.
याबाबत दैनिक स्वराज्य राष्ट्र ने बातमी प्रसारित करून नागरिकांची समस्या मंडळी व नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ ही वास्तविकता मांडत रस्त्याच्या समस्येला वाचा फोडली यामुळे स्थानिकांनी दैनिक स्वर