जमिनीच्या सेंद्रीय कर्बाकडे लक्ष द्यावे असे शेतकऱ्यांना संदीप घोले यांचे अवाहन.
कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथे ग्रामपंचायत कोरेगाव भिमा व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने कृषी दिनानिमित्त सरपंच संदिप ढेरंगे यांच्या नियोजनातून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या एली मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे उपस्थित राहत शेतकरी बांधवांनी कार्यक्रमास उदंड असा सकारात्मक प्रतिसाद दिला.(Farmer Day)
यावेळी हनुमंत शिवले यांनी हुमणी नियंत्रण बाबत सविस्तर माहिती देत मोठ्या प्रमाणात प्रकाश सापळे लावण्याचे आवाहन केले . सदर शेतकऱ्यांमध्ये प्रमुख व्याख्याते म्हणून संदीप प्याज बायो ऑर्गनिक्सचे डायरेक्टर संदिप घोले यांनी जमिनीचे आरोग्य,ऊस लागवड ,बेसल डोस ,खतमात्रा पाणी व्यवस्थापन , हुमणी, खोडकीड नियंत्रण इत्यादी बाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनीही त्यांना असणाऱ्या अडचणी यांचे शंका निरसन करण्यात आले.(महाराष्ट्र कृषी दिन)
सदर कार्यक्रमात ग्रामपंचायत कोरेगाव भिमा यांच्यामार्फत शेतकऱ्यांना हुमणी नियंत्रणासाठी मोफत औषध वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य पि के गव्हाणे होते. शेतकरी दत्तात्रय फडतरे यांनी आपले मनोगत व्यक्त करत ऊस पिक परिस्थिती व त्यावरील आव्हाने याबाबत माहिती दिली.कृषि अधिकारी प्रशांत दोरगे यांनी सुत्रसंचालन केले व कृषि खात्याच्या योजना ऑनलाइन अर्ज करून लाभ घेण्याचे आवाहन केले.माजी सरपंच अमोल गव्हाणे यांनी आभार मानले.(Farmer Day)
या कार्यक्रम प्रसंगी अण्णासाहेब मगर बँकचे संचालक राजेंद्र ढेरंगे,माजी चेअरमन पंडित ढेरंगे , माजी सरपंच विलास खैरमोडे संजय काशीद ,ग्रामपंचायत सदस्य शरद ढेरंगे, वंदना गव्हाणे,रेखा ढेरंगे, जयश्री गव्हाणे तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहत सदर कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद दिला.(Koregaon Bhima)