स्वराज्य राष्ट्रच्या बातमीचा प्रभाव , कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीची कचरा उचलण्यासाठी धावाधाव
कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथील पिंपळे जगताप वळणाला मोठ्या प्रमाणावर कचरा साठल्याने विद्यार्थी व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असून याकडे कोरेगाव भिमा ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष होत असून साधे कचरा उचलण्याचे काम ग्राम पंचायतीला करता येत नाही का ? असे वृत्त स्वराज्य राष्ट्र मध्ये प्रसारित होताच कोरेगाव भीमा ग्राम पंचायतीला खडबडून जाग आली असून कोरेगाव भिमा ग्राम पंचायतीने तातडीने कचरा उचलण्याचे काम केले असून या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या प्रवासी व नागरिकांनी आभार मानले आहेत.
कोरेगाव भीमा येथील पिंपळे जगताप रस्त्याच्या वळणाला मोठ्या प्रमाणावर कचरा साठला असून या रस्त्यावरून श्री छञपती संभाजी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थिनी, अल अमीन कॉलेज, इम्पेटेटस स्कूल, ग्लोरी इंग्लिश मिडीयम स्कूल, विद्यार्थी व विद्यार्थिनी, कंपनी कामगार, पुढे शंभू नगरी लोकवस्ती, आदिराज प्लॉटिंग, पठार वस्ती, वढू बुद्रुक,पिंपळे जगताप नागरिकांना येथून प्रवास करताना कचऱ्याच्या बाजूने प्रवास करावा लागत असल्याचे वृत्त प्रसारित होताच स्थानिक प्रशासनाला खडबडून जाग आली ग्राम पंचायतीच्या वतीने तातडीने जे सी बिने कचरा उचलण्यात आला.
समाजातील समस्या मांडण्याचे व त्याला वाचा फोडण्याचे काम स्वराज्य राष्ट्र करत असून सर्वसामान्य नागरिकांना येणाऱ्या अडचणींना व समस्यांना प्रभावीपणे मांडत त्या सोडवण्यासाठी प्रशासनाला खडबडून जागे करून समस्या सोडवायला लावल्याने नागरिकांनी स्वराज्य राष्ट्रचे आभार मानले आहेत.
या पुढे येथे नागरिकांनी व येणाऱ्या जनाऱ्यांनी कचरा टाकू नये असे आवाहन करण्यात आले असून आपला परिसर आपणच स्वच्छ ठेवण्याचे काम करायला हवे.