Thursday, November 21, 2024
Homeसाहित्य/सामाजिककोरेगाव भीमा ग्रामपंचायतीमध्ये क्रांतिदिन साजरा

कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीमध्ये क्रांतिदिन साजरा

स्वातंत्र्यसेनानी मारुती भिमाजी भांडवलकर यांना ग्रामस्थांचे विनम्र अभिवादन

कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात क्रांती दिन साजरा करण्यात आला.यावेळी कोरेगाव भिमा येथील स्वातंत्र्य सेनानी मारुती भिमाजी भांडवलकर यांना अभिवादन करण्यात आले.

देशभरात क्रांतीदीन साजरा होत असताना कोरेगाव भिमा ग्रामपंचायतीच्या वतीने क्रांतिकारकांच्या त्यागाचे व बलिदानाचे स्मरण करत त्यांना मोठ्या आदरपूर्वक विनम्रतेने अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्य सेनानी मारुती भांडवलकर यांच्या प्रतिमेचे पूजन कुमारी स्वरा नागेश गव्हाणे व सुरेश गव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी क्रांतिकारक मारुती भीमाजी भांडवलकर यांच्या कार्याची व त्यागाची माहिती देण्यात आली. या प्रसंगी कोरेगाव भीमाचे सरपंच अमोल गव्हाणे,माजी उपसरपंच नितीन गव्हाणे, प्रदीप काशीद, नागेश सुखदेव गव्हाणे, सुरेश गव्हाणे,सोमनाथ अजगर, दिलीप ढेरंगे,सचिन मोहिते, सुजाता गव्हाणे, सागर गव्हाणे , आनंदा पवार, मच्छिंद्र डफळ उपस्थित होते.

कोरेगाव भीमा हे ऐतिहासिक वैभवशाली वारसा असणारे गाव असून गावामध्ये स्वातंत्र्य सेनानी मारुती भांडवलकर यांचे भवन उभारण्यात येत असून येथे क्रांतिकारकांच्या संघर्ष त्याग, आणि बलिदान यांची माहिती देणारे चित्रे व साहित्य , स्पर्धा परीक्षा अभ्यासिका उभारण्यात येत आहे .

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!