कोरेगाव भीमा येथील गॅस कंपनीचे खोदकामास स्थगिती देत भिमा नदीवरील ऐतिहासिकपुलाला धोका नसल्याचे बांधकाम विभागाचे, संबधित इतर विभाग व गॅस एजेंन्सी यांनी लेखी हमीपत्र द्यावे व ग्रामस्थांची परवानगी घेऊनच काम सुरू करावे
कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील ऐतिहासिक पुलाखाली टोरंटो गॅस एजेन्सीचे खोदकाम काम सुरू असून या खोदकामामुळे कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जुन्या पुलाला धोका उत्पन्न होऊ शकतो म्हणून बांधकाम विभाग व संबधित विभागाचे हमीपत्र मिळाल्याशिवाय काम सुरू करण्यात येऊ नये,तसेच कोरेगाव भिमा ग्रामस्थांची या कामासाठी परवानगी घेण्यात यावी अशी मागणी करत सरपंच विक्रम गव्हाणे ,ग्रामसेवक रतन दवणे यांच्या उपस्थितीत काम थांबवण्यात आले.
कोरेगाव भीमा येथील भिमा नदीवरील दगडी चिरेबंदी बांधकाम असलेला जुना पुल हा कोरेगाव भीमाच्या वैभवात भर घालत असून या पुलाचा विदर्भाला जोडणारा महत्वाचा पुल असे पाहिले जात असून टोरांटो गॅस कंपनी यांचे खोदकाम सुरू असून यामुळे पुलाला धोका निर्माण होऊ शकतो भविष्यात या पुलाला काहीही होणार नाही व ऐतिहासिक वास्तूला धोका निर्माण होणार नाही असे लेखी हमी पत्र बांधकाम विभागाने, परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्याने , संबधित सर्व विभागांनी व सदर गॅस कंपनीने द्यावे व त्यानंतर जर पुलाला काही धोका निर्माण झाल्यास त्याला आम्ही जबाबदार राहू असे लेखी हमी पत्र देण्याची मागणी करण्यात आली.
याबाबत बांधकाम विभागाचे अधिकारी मिलिंद बारभाई यांच्याशी संपर्क साधला असता ते मीटिंग असल्याने संपर्क होऊ शकला नाही.
याबाबत कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर रुपेश कुमार सिंग यांना माजी सरपंच विजय गव्हाणे व ग्राम पंचायत सदस्य संदीप ढेरंगे यांनी मागितली असता त्यांच्याकडे परवानगी नसल्याचे सांगत जून मध्ये परवानगी साठी अर्ज केल्याचे सांगण्यात आले.
ग्रामस्थांनी केलेल्या मागण्या
१) भिमा नदीवरील ऐतिहासिक पुलाचे बांधकाम विभाग व पुरातत्व विभाग यांच्या कडून स्ट्रक्चर ऑडिट करण्यात यावे.
२) ऐतिहासिक पुलाला कुठल्याही प्रकारचा धोका नसून या गॅस पाईप लाईनमुळे भविष्यात जर काही धोका झाला तर त्याला संबधित विभाग ,परवानगी देणारे अधिकारी व संबधित गॅस एजेंसी राहिला याचे लेखी हमीपत्र देण्यात यावे.
३) कोरेगाव भीमा ग्रामस्थांच्या परवानगीने सदर काम सुरू करण्यात यावे.
याबाबतचे सेवक रतन दवणे यांनी जून , जुलै व ऑगस्ट अशा तीन महिन्यांमध्ये विषय चर्चा केली असून ऑगस्ट महिन्यात परवानगी दिली असल्याचे ग्रामसेवक रतन दवणे यांनी सांगितले. त्यांच्याकडे सदर परवानगी व ठराव प्रत सदस्य संदीप ढेरंगे यांनी मागितली असता त्यांनी प्रत देण्यास टाळाटाळ केली.
यावेळी कोरेगाव भीमाचे ग्राम पंचायत सदस्य संदीप ढेरंगे, माजी सरपंच विजय गव्हाणे, प्रकाश खैरमोडे,भोकरे, ग्रामसेवक रतन दवणे व कंपनीचे रुपेश कुमार सिंग उपस्थित होते.
सर्व परवानग्या घेऊन काम सुरू असून ग्रामस्थांनी मागितलेल्या लेखी हमी बाबत वरिष्ठांशी चर्चा करून काम सुरू करू असे प्रोजेक्ट मॅनेजर रुपेश कुमार सिंग यांनी सांगितले.
कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक पुलाला कोणताही धोका निर्माण होणार नाही व त्याच्या मजबुतीस काहीही धक्का लागणार नसून भविष्यात याबाबत जर काही नुकसान झाले तर याची जबाबदारी बांधकाम विभाग,परवानगी देणारे संबधित अधिकारी व गॅस एजेंन्सी यांनी घेऊन लेखी हमीपत्र देण्यात यावे – ग्राम पंचायत सदस्य व माजी सरपंच संदीप ढेरंगे, माजी सरपंच विजय गव्हाणे.
संबधित गॅस कंपनीच्या खोदकामात पेरणे ग्राम पंचायतीने व ऐतिहासिक जय स्तंभ इन्चार्ज खंडोजी माळवदकर यांचे वंशज ॲड रोहन जमादार यांनी विरोध दर्शवला असून या गॅस कंपनीच्या कामाला दोन तालुक्यातील पेरणे (ता.हवेली) व कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथे विरोध होत असल्याचे प्रथमतः दिसत आहे.