कोरेगाव भिमा ( ता.शिरूर) येथील वाडा पुनर्वसन येथील एका ३५ वर्षीय तरुणाने ऑनलाईन गेमचे पैसे विडरॉल होत नसल्याने व मित्रांकडील उसने पैसे परत करता न आल्याने नैराश्यापोटी एकाने गळफास घेत आत्महत्या केली असल्याची खळबळजनक घटना घडली असून यामुळे ऑनलाईन गेम व त्यामुळे उसने पैसे घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली असून ऑनलाईन गेम आणखी किती जणांचे बळी घेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे किशोर सुरेश पाटील (वय ४० वर्षे) रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अतुल सुरेश पाटील( वय३५ वर्षे) रा.वाडा पुनर्वसन नक्षत्र हौसिंग सोसायटी येथे पत्नी व दोन मुलींसह राहण्यास असून मयत अतुल पाटील यांनी ऑनलाईन गेम मध्ये पैसे गुंतले असुन ते विडरों होत नाही तसेच मित्रांकडुन खुप उसने पैसे घेतले आहे त्याचे टेन्शन आले आहे मला जगण्यात काही अर्थ नाही असे वाटते’ असे तो रामकरण याला म्हणाला तेव्हा त्यांने त्यास समजावुन सांगितले होते व त्यास मदत करण्याचे सांगितले होते.
दि.३१ मे रोजी रात्रौ १०:३० वा. चे सुमारास फिर्यादी कामावरून घरी आले असताना मला भावजय यांचा फोन आला त्या मुलांसह माहेरी गेल्या होत्या व पती उचलत नाही तुम्ही तुमच्या भावाला फोन करा’ असे सांगितल्यावर त्याला फोन केला परंतु त्याने फोन उचलला नाही. त्यानंतर त्याचा शेजारी रामकरण कुमावत याला फोन केला व त्याला त्याचे रूमला जायला सांगितले त्याने त्याचा दरवाजा खुप वेळा वाजविला परंतु अतुल याने दरवाजा उघडला नाही तेव्हा अतुल पाटील यांचे प्लॅटची पाठीमागील खिडकी उघडी होती तेव्हा शिडी लावुन खिडकीतुन पाहिले असता अतुल पाटील याने त्याचे बेडरूममधील कपडे वाळविण्यासाठी बांधलेली दोरीस गळफास घेवुन आत्महत्या केली आहे सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात करत आहेत.