कोरेगाव भिमा – कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथील फरची ओढ्या शेजारील इंडियन ऑईल व सी एन जी पंप असून मागील दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर येथून सी एन जी पंपातून मोठ्या प्रमाणावर वास येत असून पुणे नगर महामार्ग पर्यंत असाधारण दोनशे फुटांपर्यंत तीव्र वास येत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरेगाव भिमा येथे युनिक पेट्रोलियम या नावाने पंप असून पुणे नगर महामार्गावरून प्रवास करणारे अनेक वाहन धारक येथे पेट्रोल, डिझेल व सी एन जी टाकण्यासाठी थांबत असतात पण मागील दोन दिवसांपासून येथील सी एन जी पंपातून गॅस चा तीव्र वास येत असल्याने शेजारील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत संबधित संबधित सी एन जी पंप चालक विकास खाजेकर यांच्याशी संपर्क साधला असून सी एन जी कंपनीशी संपर्क केला असून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली असल्याचे सांगितले.