Sunday, September 8, 2024
Homeक्राइमकोरेगाव भिमा येथे व्यावसायिकाच्या आत्महत्येप्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल

कोरेगाव भिमा येथे व्यावसायिकाच्या आत्महत्येप्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल

कोरेगाव भिमा – कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील किराणा व्यावसायिक किरण कुलकर्णी यांनी खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांत अकरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या प्रकरणी महेश कुलकर्णी यांनी तक्रार दिली असून नवनाथ भंडारे, संतोष भंडारे, संदीप अरगडे (तिघे रा. वढू बुद्रुक), सुधाकर ढेरंगे, कांतीलाल रामचंद्र ढेरंगे, अमोल गव्हाणे (तिघे रा. कोरेगाव भीमा), शांताराम सावंत (रा. वाडागाव), अजय यादव, जनार्धन वाळूज (रा. लोणीकंद, ता. हवेली), जातेगाव खुर्दचे  किशोर खळदकर, मामा सातव (रा. वाघोली), अशी गुन्हे दाखल केलेल्यांची नावे आहेत.

व्यावसायिक किरण कुलकर्णी यांचा वैष्णवी सुपर मार्केट नावाने व्यवसाय करीत होते, करोनामध्ये व्यवसाय अडचणीत आल्यानंतर त्यांनी काही खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतलेले होते. किरण यांनी सुधाकर ढेरंगे व कांतीलाल ढेरंगे यांच्यासोबत भागीदारीत इमारत बांधलेली होती. खासगी सावकारांना व्याज दिल्याने किरण अडचणीत आले. त्यांनी ढेरंगे यांच्यासोबत भागीदारीत असलेली सदनिका व गाळा विक्रीचा निर्णय घेतला. मात्र, त्याला खरेदीसाठी व्यक्ती आल्यास ढेरंगे त्यांना इमारत घेऊ देत नव्हते, व्यवहार मोडत होते. सावकारांचा त्रास व ढेरंगे देत असलेल्या त्रासाला कंटाळून किरण सुरेश कुलकर्णी यांनी भीमा नदीत आत्महत्या केल्याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे त्यांचे बंधू महेश कुलकर्णी यांना तक्रारीमध्ये उल्लेख केला असून सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक डोंगरे करत आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!