कोरेगाव भिमा – पेरणे फाटा (ता.हवेली) येथील हनुमंतराव चौधरी काळभैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित च्या व्हॉईस चेअरमन पदी दिनकर ज्ञानोबा गव्हाणे यांची बिनविरोध निवड झाल्याने कोरेगाव भिमा परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.विशेष म्हणजे डी डी गव्हाणे यांनी संस्थेत १३ वे वर्ष संचालक म्हणून काम करत आहेत.
पतसंस्थेच्या व्हॉईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल चेअरमन पूनम चौधरी, संचालक अविनाश जगताप, सागर चौधरी, जयवंत चौधरी, पांडुरंग खेडेकर,विठ्ठल चौधरी,अमोल चौधरी, तानाजी चौधरी, शिवाजी केसकर, रेश्मा चौधरी, गोरख चौधरी, संभाजी वाळके, रघुनाथ चौधरी, नितीन गव्हाणे, केशव चौधरी,व्यवस्थापक अनिल जवळकर यांनी निवडीबद्दल अभिनंदन केले.
भैरवनाथ पतसंस्थेच्या ठेवी २३ कोटी रुपयांच्या असून १७ कोटी रुपयांची कर्जे वाटप करण्यात आली असून ऑडिट मध्ये ‘अ’ दर्जा प्राप्त असून सभासदांना १० टकके लाभांश वाटप करण्यात येते तर नफा ५० लाख रुपयांचा असल्याने पूर्व हवेली तालुक्यातील नामांकित व विश्वसनीय पतसंस्था असा नावलौकिक आहे.
कोरेगाव भीमाचे सुपुत्र यांचे बांधकाम क्षेत्रासह पतसंस्था क्षेत्रात भरीव व उल्लेखनीय कामगिरी – अजिंक्य एंटरप्रायजेस च्या माध्यमातून मागील ३० वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय व विश्वसनीय काम करत असून प्रामुख्याने श्री छञपती संभाजी महाराज यांच्या समाधिस्थळाचा पाया बांधण्याचे, वढू बुद्रुक ग्राम पंचायतीचे बांधकाम, कोरेगाव भीमा येथील फ्रेंड्स एज्युकेशन शिक्षण संस्थेचे बांधकाम व इतर अनेक गोरगरीब व सर्वसामान्य लोकांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम डी डी गव्हाणे यांनी केले आहे.