Sunday, September 8, 2024
Homeक्राइमकेलेल्या उपकारांची परत फेड कर तू बायको सारखीच म्हणत सासऱ्याचा सूनेवर बलात्कार

केलेल्या उपकारांची परत फेड कर तू बायको सारखीच म्हणत सासऱ्याचा सूनेवर बलात्कार

सुनेला पिठाची गिरणी काढून देत उपकाराची परतफेड कर असे म्हणत सासऱ्याने सुनेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने परिसरातून एकच संताप व्यक्त होत आहे. सासऱ्यानेच सुनेवर लैंगिक अत्याचार केल्याचा निंदनीय प्रकार परभणीच्या जिंतूर शहरात घडला आहे.या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Crime News)

पीडित महिलेच्या पतीला दारूचे व्यसन असून  तो दिवसरात्र नशेत असतो. तो काहीच काम धंदा करत नाही. म्हणून सासऱ्याने पीडितेला पिठाची गिरणी टाकून दिली होती. त्या माध्यमातून कष्ट करत पैसे कमवून ती घर चालवत होती. यावरुन सासऱ्याने तिला सुनावले होते. केलेल्या उपकारांची परतफेड कर म्हणत सासऱ्याने दुपारच्या वेळी घरात कुणी नसताना पीडितेवर अत्याचार केला. तसंच, मी तुझा पूर्ण सांभाळ करेन तु माझ्या पत्नीसारखीच आहेस. याबबात कोणाला सांगू नकोस, असं म्हणत पीडित महिलेला धमकावले. (Crime News)

सासऱ्याने सुनेवर अत्याचार केल्यानंतर ती खूप धास्तावली होती. मात्र हिंमत न हारता तिने तिने जिंतूर पोलिस स्थानक गाठून रात्री उशीरा सासऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. पिडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी या नराधम सासऱ्यांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात संपात व्यक्त करण्यात येत आहे.(Crime News)

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!