प्रतिनिधी हेमंत पाटील
कराड – दिंनाक २६ नोव्हेंबर
कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय सेवेतील योगदान अभूतपूर्व असून कोविड काळात कृष्णा हॉस्पिटलने दिलेली वैद्यकीय सेवा विशेष उल्लेखनीय आहे, असे गौरवोद्गार काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृष्णा हॉस्पिटलच्या वैद्यकीय सेवेचे कौतुक केले.
कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी डॉ. अतुल भोसले यांनी कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवेबद्दल माहिती देत, कोरोना काळात केलेल्या कार्याचा आढावा घेतला. याचबरोबर कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्याची माहितीही मुख्यमंत्र्यांना दिली. तसेच कराड दक्षिणमधील विविध विकासकामांबाबत चर्चा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृष्णा हॅस्पिटलला सदिच्छा भेट देऊन, परिसराची पाहणी केली.
याप्रसंगी पालकमंत्री शंभुराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार सर्वश्री जयकुमार गोरे, महेश शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधीक्षक समीर शेख, कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले ,धनलक्ष्मी पतसंस्था आणि धनलक्ष्मी फाउंडेशनचे अमित चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते.