अली रियाज थावेर याच्यावर प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ प्रमाणे गुन्हा आला नोंदवण्यात
पुणे – हडपसर (ता.हवेली) येथे एक धक्कादायक घटना घडली असून हडपसर पोलीस स्टेशन हद्दीमधील “इन्केव्ह लोकमंगल सोसायटी” झेड कॉर्नर, मांजरी बुद्रुक येथील एका इसमाने कुत्रा नेहमी त्रास देतो, या कारणावरून त्यास एअरगनचा छरा मारून जखमी केले.
सदर प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीस ताब्यात आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.याबाबत हडपसरप पोलीस स्टेशन येथे प्रिती विकास आग्रवाल वय ४६ वर्षे व्यवसाय गृहीणी रा.मांजरी बुद्रुक ता. हवेली यांनी फिर्याद दिली असून अली रियाज थावेर रा. मजरी बुद्रुक यांना अटक करण्यात आली आहे.
हडपसर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार दिनांक २१ नोव्हेंबर रोजी रात्रौ ११ वा. सुमारास किरण इन्केव्ह लोकमंगल सोसायटी झेड कॉर्नर मांजरी बुद्रुक (ता. हवेली ) या सोसायटीचे समोरील डांबरी रोडवर पाळीव कुञी बाउंसी ही बसलेली असताना अली रियाज थावेर रा. मांजरी बुद्रुक (ता. हवेली) याने त्याचेजवळ असलेली स्पोर्टस गनने फायर करुन तीस जखमी करुन विकलांग केले आहे.याबाबत माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन दाभाडे यांनी तातडीने भेट दिली.
अली रियाज थावेर याच्यावर प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संतोष गोरे पुढील तपास करत आहे