कुलदीप मोहिते कराड
कराड – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून दिनांक १० ऑगस्ट रोजी माणिक चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत उंब्रज ता कराड येथे तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावरून बोलताना माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीयावर्षी स्वातंत्र्य लढ्याचा अमृत महोत्सव आपण तिरंगा यात्रेने साजरा करीत आहोत. ९ ऑगस्ट या दिवसाला आपल्या देशात अनन्य साधारण महत्व आहे. ९ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबई येथील गवालिया टॅंक येथून महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांना “चले जाव” ची निर्णायक हाक दिली. यामुळे या दिवसाला क्रांतीदिन म्हणून ओळखले जाते. या दिवसापासून पुढे स्वातंत्र्य मिळेपर्यंत हा निर्णायक लढा चालूच राहिला. या लढ्यात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांचा जाज्वल्य इतिहास आजच्या पिढीला समजणे गरजेचे आहे, म्हणून काँग्रेस पक्षाकडून संपूर्ण देशभर प्रत्येक जिल्ह्यात किमान ७५ किलोमीटर ची तिरंगा हातात घेऊन पदयात्रा काढली जात आहे.
यानिमित्ताने स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान सांगण्याची संधी मिळत आहे. आपल्या पूर्वज्यांचे आभार मानण्याचा हा दिवस आहे. ज्यांच्यामुळे आपल्याला ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेपासून मुक्तता मिळाली. हि पदयात्रा १५ ऑगस्ट पर्यंतच आहे असं न समजता या यात्रेच्या निमित्ताने जो विचार आपण घराघरात पोहचवीत आहोत तो स्वातंत्र्य संग्रामाचा विचार आपण कायम जपला तरच ती खरी श्रद्धांजली स्वातंत्र्य सेनानीना राहील. आज स्वतंत्र भारतातील स्वातंत्र्य उपभोगताना युवा पिढीने इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळविताना क्रांतिकारकांनी काय वेदना सहन केल्या आहेत, जो त्याग केला आहे तो जाणून घेणे गरजेचे आहे.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य मारुती जाधव कराड तालुका अध्यक्ष काँग्रेस हेमंत जाधव, युवक जिल्हा सरचिटणीस कॅप्टन इंद्रजीत जाधव, मधुकर जाधव,वसंतराव पाटील, नौशाद मोमीन तसेच विविध मान्यवर व काँग्रेस कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते