हेमंत पाटील सातारा
सातारा – कराड मधील बाळासाहेबांची शिवसेनेचा समाजोपयोगी उपक्रम राबवत केली दिवाळी साजरी करत अनोखा सामाजिक संदेश दिला आहे.आई-वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा असल्याचे सांगण्यात येते पण आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये ठेवल्यावर दिवाळी सारख्या सणाच्या दिवशी सुद्धा आई-वडिलांना आश्रमात न्यायला अथवा त्यांना भेट द्यायला येऊ न शकणाऱ्या मुलांविषयी बोलणे त्यांच्यावर टीका करणे टाळत आपणच दिवाळी सण वृद्धाश्रमात साजरा करायचा असे ठरवत कराड मधील शिवसैनिकांनी अनोखा समाजोपयोगी उपक्रम राबवत समाजासमोर एक अनोखा आदर्श ठेवला आहे.
सांगली जिल्ह्यातील नेर्ले येथील शिवशंभो वृद्धाश्रम सेवा मंडळ ( ट्रस्ट) येथील वृद्धाश्रमात दिवाळी सणानिमित्त सदिच्छा भेट आणि शिधा, फराळ, पणती, उटणे, भेटवस्तू वाटप करण्यासह भरपूर गप्पा गोष्टी करताना माणूसकिचे दर्शन घड़वानारी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांची शिवसेना मधील शिवसैनिक आणि संजय मोहिते यांच्या पाऊलावर पाउल ठेवत उपजिल्हाप्रमुख अक्षय संजय मोहिते व कै.चंद्रकांत पवार यांचा सुकन्या सातारा जिल्हा महिला शिवसेना उपसंघटीका सुलोचना चंद्रकांत पवार व शिवसेना कराड उपशहर प्रमुख संदीप थोरवडे,कराड उपशहर प्रमुख गणेश भोसले व शिवसैनिक सूरज सावंत,अजय जामदार यांनी हा अभिनव उपक्रम राबवत माणुसकीचे दर्शन घडवत शिवसेनेची पाळेमुळे ही सामन्यातील सामान्य माणसाच्या सुख दुखाशी एकरूप असल्याचे कृतियुक्त उदाहरण ठेवले आहे.