कराड हेमंत पाटील
कराड- सातारा जिल्ह्यात ऊसदर जाहीर होत नसल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे. दोन दिवसापूर्वी एक ट्रॅक्टर पेटविला होता, कारखान्यांकडे जाणारी ऊस वाहतूक रोखली होती. आता सह्याद्री साखर कारखान्यांकडे जाणाऱ्या वाहनांची हवा अज्ञातांनी सोडली आहे. त्यामुळे ऊस दर संघर्ष समितीच्या आवाहनाला प्रतिसाद शेतकऱ्यांकडून मिळू लागला आहे. या प्रकारामुळे ऊस दराचे आंदोलन आता चिघळू लागले आहे.
ऊस दर जाहीर करण्यासाठी ऊस संघर्ष समितीने ऊस परिषद घेऊन ऊस दर जाहीर करावा अशी मागणी केली होती. यशवंतराव चव्हाण समाधी स्थळावर पायी दिंडी पण काढली होती व आठ दिवसांचा अवधी दिला होता तरीही कारखाने ऊस दर जाहीर करत नाही व ऊस तोडणी चालू ठेवली आहे म्हणून संघर्ष समिती व शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी गनिमी काव्याने आंदोलन तीव्र करण्याची चिन्हे दिसत आहे.
कोपर्डी हवेली येथील ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची हवा सोडली शनिवारी मसूर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखाना ऊस वाहतूक ट्रॅक्टरची हवा सोडली कराड तालुक्यातील इंदोली फाटा येथे ट्रॅक्टर जाळण्याचा प्रकार घडला पोलीस बंदोबस्त ऊस वाहतूक केली जात आहे तरीही शेतकरी संघटना व शेतकरी गनिमी काव्याने आपले आंदोलन तीव्र करताना दिसत आहे याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत