‘ मदत रक्ताची संघटने’च्या माध्यमातून केलेल्या कार्याची दखल
कुलदीप मोहिते कराड
उंब्रज – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने बिहार येथील गया येथे शहीद भगतसिंग युथ ब्रिगेड यांच्या द्वारे आयोजित केलेल्या नॅशनल अवॉर्ड पुरस्कार सोहळ्यात सातारा जिल्हातील उंब्रज ( ता .कराड) गावचे सुपुत्र समाजसेवक परेशकुमार कांबळे यांना शहीद भगतसिंग युथ ब्रिगेड २०२२ हा पुरस्कार देवून गौरवण्यात आले.
कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये अनेक लोकांना रक्ताची मदत करून जीवनदान देण्याचे काम, समाजातील अनेक लोकाना वेळेवर रक्ताची मदत मिळावी म्हणून ‘ मदत रक्ताची संघटना’ या संघटनेमार्फत रक्तदानासाठी महत्वपूर्ण सामाजिक योगदान दिल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला.
मदत रक्ताची संघटनेचे अध्यक्ष परेशकुमार कांबळे यांनी विविध समाजकार्यात ठसा उमटवला आहे, त्यांच्या या निस्वार्थ सेवेसाठी विविध स्तरातून राज्यातून त्यांना अनेक पुरस्काराने ही सन्मानित केले गेले आहे .हा पुरस्कार माझ्या मदत रक्ताची संघटना महाराष्ट्र मधील सर्व रक्तदात्यांचा असून मी सर्वांचा प्रतिनिधी म्हणून हा पुरस्कार स्वीकारला तसेच प्रत्येक तरुणांनी पुढे येऊन रक्तदान करावे असे आव्हान ही त्यांनी पुरस्कारा दरम्यान केले समाजातील विविध स्तरातून मदत रक्ताची संघटना व परेश कुमार कांबळे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.