शिक्रापूर (ता.शिरूर) येथील एम एस सी बीच्या गलथान कारभाराने चाकण रोड येथील दहावीच्या विद्यार्थ्यांचे ऐन बोर्डाच्या परीक्षेच्या काळात भविष्य अंधारात जाण्याची भीती पालकांकडून व्यक्त करण्यात येत असून ७ मार्च रोजी जळालेला ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करण्यासाठी विलंब झाल्याने विद्यार्थ्यांच्या नुकसानीस कोण जबाबदार राहणार असा संतप्त प्रश्न ग्रामस्थांकडून विचारण्यात येत आहे.
एम एस सी बी विभागाच्या गलथान काराभाचा फटका शिक्रापूर येथील खेडकर वस्ती येथील विद्यार्थ्यांना बसत असून वर्षभर जीव तोडून दहावीचा अभ्यास करायचा आणि ऐन परीक्षेच्या कालावधीत वीज उपलब्ध नसावी यासारखे दुर्दैव काय असावे ? विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा तरी कसा ? रिव्हिजन करायची तरी कशी? विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रकार आहे की काय ? असा संतप्त प्रश्न विचारण्यात येत आहे.
येथील नागरिकांनी ७ मार्च रोजी ट्रान्सफॉर्मर जळाल्याने दुरुस्त करून मिळण्यासाठी अर्ज केला असून त्यावर २४ नागरिकांच्या सह्या आहेत.यावर एम एस सी बी विभागाकडून तातडीने ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.