हवेली प्रतिनिधी सुनील थोरात
हवेली : उरुळी कांचन ( ता.हवेली)
पूर्व हवेलीतील उरुळी कांचन ग्रामपंचायतीला जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ७९ कोटी ५३लक्ष रुपयांच्या निधीची शासकीय मंजुरी मिळाली असल्याची माहिती उरुळी कांचनचे सरपंच संतोष कांचन यांनी दिली आहे.
नळ पाणी पुरवठा योजनेच्या प्रस्तावास आमदार अशोक पवार,मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, पुणे तसेच सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक छाननी समितीच्या दिनांक ६ डिसेंबर, २०२१ रोजीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार उरुळी कांचन येथील ५५ लिटर दरडोई दरदिवशी क्षमतेच्या रुपये ११ हजार ४४४ इतका दरडोई खर्च असलेल्या नळ पाणी शासन निर्णय पुरवठा योजनेच्या ढोबळ किंमतीच्या अंदाजपत्रकास व आराखड्यास जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत अटी व शर्तीची पूर्तता करण्याच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
१० जानेवारी रोजी दिलेल्या राज्यपालांच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी रवींद्र भराटे यांच्या स्वाक्षरीने प्रशासकीय मंजुरी दिलेले परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
राज्य सरकारने जो निर्णय घेतला आहे तो उरुळी कांचन येथील नागरिकांच्या भविष्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाणी तुटवडा जाणवायचा तसेच मुळा मुठा कालव्यावर उरुळी कांचनचा पाणीपुरवठा अवलंबून होता. उरुळीकरांची जी तहान होती ती ह्या रूपाने भागली आहे. यासाठी ग्रामपंचायतीच्या सर्व नागरिकांचे, देवस्थान कमिटीचे यश असून हा निर्णय स्वागाताहार्य आहे. यासाठी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी केलेली मदत मोलाची आहे. सरपंच संतोष कांचन, उरुळी कांचन