Thursday, November 21, 2024
Homeराजकारणउद्योगनगरी सणसवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी दत्तात्रय हरगुडे यांची बिनविरोध निवड

उद्योगनगरी सणसवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी दत्तात्रय हरगुडे यांची बिनविरोध निवड

ढोल ताशांच्या गजरात पुष्प वृष्टी करत आमदार अशोक पवार यांचे स्वागत

कोरेगाव भीमा – उद्योगनगरी सणसवाडी ( ता.शिरूर) येथील उपसरपंचपदी दत्तात्रय हरगुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.माजी उपसरपंच सागर दरेकर यांनी ठरलेल्या वेळी राजीनामा देत एक आदर्श ठेवला याचे सर्वत्र कौतुक होत आहे. उद्योगनगरी सणसवाडी ग्राम पंचायतिच्या उपसरपंचपदी दत्तात्रय हरगुडे यांच्या निवडीचा सोहळा उत्साहवर्धक व आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला.

यावेळी आमदार अशोक पवार यांनी हे सरकार हिंदुत्वाचा अजेंडा नेत महाराजांच्या नावांच्या घोषणा देते त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या विकास आराखड्याबाबत चांगले काम करायला हवे आम्ही २७० कोटींची तरतूद केली तुम्ही ४७० कोटींची करा पण छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाबाबत योग्य भूमिका घ्यायला हवी. आराखड्याला स्थगिती दिली नाही असे सांगितले आहे.

तसेच आमदार पवार यांनी सणसवाडी ग्राम पंचायतीचा कचरा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असून प्रत्येक नागरिकाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळायला हवे यासाठी काम करणार आहे तसेच येथे गायरान अथवा पुनर्वसन जागा ,कंपन्यांचा अँमीनिटी जागा शासनाने दिल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न सोडविणार असल्याचे सांगितले.विकास कामांना गती देत गुणवत्ता राखायला हवी.सणसवाडीला पहिला आमदार निधी मी दिला.पदाचा काळ कमी असला तरी प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करून लोकांना वेळ देत काम करायला हवे.जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करायला हवे असे मत व्यक्त केले.

सणसवाडी ग्राम पंचायतीचे प्रांगणात भव्य मंडप टाकण्यात आला होता यावेळी तालुक्यासह पंचक्रोशीतील विविध मान्यवरांच्या उपस्थितित हा देखणा सोहळा पार पडला.यावेळी ग्राम पंचायत सणसवाडी विकासाच्या बाबतीत उल्लेखनीय व महत्वपूर्ण काम करत असून विकासाचा आलेख उंचावत ठेवत असल्याचे मत मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच विजयराज दरेकर, माजी संचालक दत्तात्रय हरगुडे, माजी सरपंच सुनंदा दरेकर, माजी उपसभापती आनंदराव हरगुडे व राजेंद्र दरेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी राजेंद्र दरेकर यांच्या अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी भाषण चर्चेचा विषय ठरले.

शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक पवार यांचे आकर्षक व दिमाखदार फेटा बांधत,त्याला तितकाच देखणा आकर्षक खड्यांचा तुरा लावण्यात येऊन पुष्प वृष्टी करत, ढोल ताशांच्या गजरात व तुतारीच्या गगनभेदी ललकारीमध्ये अत्यंत उत्साहाच्या वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले.तसेच आमदार अशोक पवार यांना अत्यंत सुंदर अशी राधा कृष्णाची मूर्ती देण्यात आली.

उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याने नरेश्र्वर मंदिर व ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या मंदिराला आकर्षक पुष्प सजावट करण्यात आली होती.

यावेळी सरपंच संगीता हरगुडे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर, संचालक राजेंद्र नरवडे, माजी उपसभापती आनंदराव हरगुडे,माजी उपसरपंच युवराज दरेकर,माजी सरपंच स्नेहल भुजबळ,माजी उपसरपंच सागर दरेकर, सुवर्णा दरेकर, शशिकला सातपुते, दिपाली दरेकर, दगडू दरेकर, अक्षय कानडे , रुपाली दरेकर, ललिता दरेकर ,उद्योजक रामदास दरेकर, सरपंच प्रफुल्ल शिवले, काँग्रेसचे वैभव यादव, माजी उपसरपंच बाबासाहेब दरेकर, मनसे नेते रामदास दरेकर, माजी चेअरमन सुहास दरेकर, आत्माराम वाळके ग्रामसेवक बाळनाथ पवने व ग्रामस्थ उपस्थित होते.

आमदार अशोक पवार यांची दर्जेदार, गुणवत्तापूर्ण कामे, माणुसकी, आपुलकी व अभ्यासपूर्ण विकासाचे नियोजन प्रेरणादायी आहे.उपसरपंचपदी बिनविरोध निवड केल्याने मी सर्व मतदार,ग्रामस्थ ,हितचिंतक यांचे अभ्आअरी आहे.आईच्या पुण्याई व आशीर्वादाने हे पद मिळाले असून यातून जनसेवा व लोकांचे कल्याण करण्याचा प्रयत्न करणार आहे.- नवनिर्वाचित उपसरपंच दत्तात्रय हरगुडे,ग्राम पंचायत सणसवाडी

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!