चाकण – भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांची उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी शिरूर लोकसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील उद्योजक प्रमोद भंडारे यांची भाजपाच्या उत्तर पुणे जिल्हा उद्योग आघाडीच्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील उच्चशिक्षित असणारे व मराठा सेवा संघात व्यापक काम करणारे , ग्रामीण व शहरी भागातील तरुणाईशी जवळीक असलेले प्रमोद भंडारे हे उद्योजक आपल्या उद्योगाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार देण्याचे काम करत असून मनमिळावू व दिलदार स्वभावाने तरुणाईचा दांडगा संपर्क असलेल्या ग्रामीण भागातील उभरत्या नेतृत्वाला संधी दिल्याने शिरूर लोकसभा निवडणुकीसह आगामी काळातील निवडणुकांमध्ये याचा भाजपा पक्षाला फायदा होण्याची शक्यता आहे.
भारतीय जनता पार्टी लोकसभेची जोरदार तयारी करत असून विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करत पक्षाच्या व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांना सर्व समाज घटकांपर्यंत पोचवण्यासह समाजातील विविध क्षेत्रातील तरुणांना पक्षामध्ये सहभागी करून घेत त्यांना पदाची जबाबदारी देत पक्ष विस्तार करत लोकसभेची जय्यत तयारी करण्यात येत आहे.
यावेळी पी डी सी सी बँकेचे संचालक प्रदीप कंद,शरद बुट्टे पाटील, भगवान शेळके , उद्योग आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष रवींद्र गायकवाड,शिरूर लोकसभा विस्तारक श्रीकुर्ष्ण देशमुख ,शिरूर तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे , शिरूर तालुका उद्योग आघाडीचे बाबासाहेब दरेकर, माजी सरपंच राहुल गव्हाणे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.