उंब्रज – दिनांक ६ डिसेंबर
उंब्रज (ता. कराड) येथील प्रसिद्ध व्यापारी जगन्नाथ पाटणे यांच्या पत्नी व बांधकाम व्यावसायिक संतोष पाटणे यांच्या मातोश्री लक्ष्मी पाटणे ( वय ७२ वर्षे) यांचे काल ( ५ डिसेंबर) रोजी सायंकाळी निधन झाले.
परिसरातील विविध सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचा सहभाग असायचा त्यांच्या अकस्मात निधनाने उंब्रज परिसरातून शोक व्यक्त करण्यात येतं आहे. समाजातील सर्व स्तरातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिन्यात आली , त्यांचं अंत्य दर्शन घेण्यासाठी समाजातील तसेच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात पती जगन्नाथ पाटणे, दोन मुले ,दोन मुली, सुना , नातवंडे , पै - पाहुणे असा मोठा परिवार आहे.