ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्वपूर्ण सुविधा
कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथील इव्हर इलेक्ट्रॉनिक्स प्रा.लि. या कंपनीने सी एस आर फंडाच्या माध्यमातून श्री छत्रपती संभाजी हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या विकासासाठी फर्निचर सहीत एअर कंडिशन काँम्प्युटर प्रशिक्षण केंद्र व शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ देत आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.
श्री छञपती संभाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांसाठी संपुर्ण फर्निचर सहीत एअर कंडिशन काँम्प्युटर प्रशिक्षण केंद्र व शुध्द पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ फिल्टर प्लान्ट यांचे उद्घाटन कंपनीचे एम डी बुयाँग अॕन , संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी औद्योगिक क्षेत्र कायमच मोलाचे योगदान देत असते यासाठी सी एस आर फंडाच्या माध्यमातून विविध सामाजोपयोगी कामे करण्यात येत असतात.
याप्रसंगी विभागीय सदस्य, संस्थेचे इतर पदाधिकारी , सल्लागार समिती अध्यक्ष , उपाध्यक्ष व सदस्य तसेच ग्रामपंचायत चे आजी माजी पदाधिकारी , देणगीदार , हितचिंतक व सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद मान्यवर व इव्हर इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही पदाधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख राहिल्याने मुख्याध्यापकांनी दिलगिरी व्यक्त करत सर्व ग्रामस्थ ,पदाधिकारी व देणगीदार शाळेसाठी महत्वपूर्ण असल्याचे सांगितले.
सरपंच पद गावाचे आहे ,तो गावाचा बहुमान आहे ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांनी शाळा सोडून राजकारण करावे.आम्ही मात्र शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार आहोत पातळी सोडून राजकारण करू नये. राजकारण शैक्षणिक क्षेत्रात आणू नये शाळा सर्व गावाची आहे ठरावीक लोकांची नाही असे मत सरपंच विक्रम गव्हाणे यांनी व्यक्त केले.