कौटुंबिक जबाबदारी सांभाळत स्वप्नांना घातली गवसणी
पती महेश ब्राम्हणे व सासू कमल ब्राम्हणे यांची खंबीर साथ तर कुटुंबाचा महत्वपूर्ण पाठिंबा
कोरेगाव भीमा – शिक्रापूर (ता.शिरूर)
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील आमला वाहेगांव येथील राधाकृष्ण लक्ष्मण केंडे यांनी तीस वर्षांपूर्वी शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी राहून वेगवेगळ्या कंपनीमध्ये कालांतराने महाराष्ट्र पोलीस खात्यातील होमगार्ड मध्ये नोकरी करून आपल्या मुलांना चांगले शिक्षण देता येईल तोच ध्यास मनामध्ये ठेवला होता. कष्टाचे फळ झाले (सार्थकी आले) असं (राधाकृष्ण लक्ष्मण केंडे मुलीचे वडील) यांनी सांगितले.केवळ उपजिवीकेसाठी शिक्रापूरात स्थायिक झालेले राधाकृष्ण केंडे यांना दोन मुले व एकुलती एक आरती हे कन्यारत्न. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतही केंडे दांपत्यांनी आपल्या तिनही मुलांचा उच्च शिक्षणाचा रस्ता रोखला नाही. सन २०१३ मध्ये आरती या बी.ए.च्या पहिल्या वर्षात असताना शिक्रापूरातच स्थायिक मुळ औरंगाबादचे महेश ब्राम्हणे यांचे स्थळ आले असताना आरतीच्या पुढच्या शिक्षणासाठी आग्रह ठेवला व ब्राम्हणे परिवारानेही आरती यांना आपली स्नुषा करुन घेताना तिचे उच्चशिक्षण पूर्ण करुन घेतले. पुढे आरती यांनी आपला मोर्चा स्पर्धा परीक्षांकडे वळविला आणि एक दिवस आरती व केंडे-ब्राम्हणे परिवारासाठी आनंदाचा ठरला. कारण आरती यांनी नगरविकास खात्यात लेखा परीक्षक परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होवून त्या थेट म्हसाळा नगर परिषदेत (जि.रायगड) लेखा परीक्षक म्हणून नुकत्याच नियुक्त झाल्या.
केवळ उपजिवीकेसाठी आपले मुळ गाव, दुष्काळी जिल्हा सोडून शिक्रापूरात स्थायिक झालेल्या केंडे-ब्राम्हणे परिवारासाठी हा अत्यंत आनंदाचा दिवस असताना गे तमाम शिक्रापूरकरांनी दोन्ही कुटुंबाचे अन आरतीचे कष्ट पाहिल्याने या सर्वांचे सध्या कौतुक सुरू केले आहे. लवकच दोन्ही कुटुंबासह आरतीचा जाहीर सत्कार करण्याचा निर्णयही शिक्रापूर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोकशेठ शहाणे यांनी सकाळशी बोलताना जाहीर केला.
आरतीचा दोन्ही कुटुंबांना प्रचंड अभिमान : पती महेश ब्राम्हणे
उच्च शिक्षणासाठी घर-कुटुंब संभाळून आरतीने वाघोली व पुण्यात दररोजचा प्रवास करुन जे यश मिळविले त्याचा सार्थ अभिमान आम्हा दोन्ही कुटुंबांना
शिक्रापूर येथील ब्राम्हणे कुटुंबीय अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून विविध क्षेत्रात उभे राहिले आहे. शिक्षणात भरारी घेणाऱ्या या कुटुंबातील घटक उच्चशिक्षित असून उद्योजक, प्राध्यापक , शिक्षक, क्लार्क , पत्रकार , इंजिनियर, अशा विविध क्षेत्रात कार्यरत असून घराण्याचा नावलौकिक वाढवत आहेत.