मराठा आरक्षण व ज्या युवकांसाठी यात्रा काढली तेच जर अस्वस्थ आणि आत्महत्या करत असेल व राज्य संवेदनशील असेल तर
शिरूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांनी युवा संघर्ष यात्रा (Yuva Sangharsh yatra) काढली होती. मात्र, ४ दिवसानंतर ही यात्रा स्थगित करण्यात आली आहे. मात्र मराठा आरक्षण व राज्यातील युवकांची अस्वस्थता आणि आमचा जो स्वाभिमानी महाराष्ट्र आहे. तो सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. तो अशांत हे पटत नाही. ज्यांच्यासाठी ही यात्रा काढली, ते युवा अस्वस्थ असताना ही यात्रा सुरू ठेवणे योग्य नाही. राज्यातील युवक आज आत्महत्या करत असतील आणि राज्यातील वातावरण अस्वस्थ असेल आणि त्या राज्य संवेदनशील असेल, तर अशा परिस्थितीत यात्रा सुरू ठेवणे योग्य नाही.अशांत हा युवांमुळे, युवांच्या अडचणींमुळे आहे. त्या अडचणी सुटाव्यात अशी भूमिका आमच्या सगळ्यांची आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे (Rashtrawadi Congres)आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा काही काळासाठी स्थगित केले आहे.
मागील तीन दिवसांपासून रोहित पवार यांनी पुणे जिह्यातील हवेली शिरूर तालुक्यातून युवा संघर्ष यात्रा सुरू केली होती.मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेली युवा संघर्ष यात्रा तूर्तास स्थगित केली आहे. आज त्यांनी पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला. आज संध्याकाळी आमदार संदीप क्षीरसागर, रोहित आर.आर. पाटील, जयदेव गायकवाड व राज्यातील विविध जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रोहित पवार यांनी हा निर्णय जाहीर केला. शुक्रवार दिनांक २७ ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे जाहीर केले.
गावबंदीच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा थांबवता आहात का?
या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले की, गावबंदीच्या निर्णयावर हा निर्णय घेतला नाही, आज महाराष्ट्र अस्वस्थ आहे. या यात्रेदरम्यान एका गावात मी स्वतः सर्वांना भेटलो, तेव्हा आम्ही मराठा आरक्षणावर ठाम असल्याचे सांगितले. तेव्हा सर्वजण आमच्याबरोबर काही अंतर चालले. मी गावबंदीमुळे अजिबात स्थगिती केली नाही, तर ज्यांच्यासाठी ही यात्रा काढली, ते युवा अस्वस्थ असताना ही यात्रा सुरू ठेवणे योग्य नाही. राज्यातील युवक आज आत्महत्या करत असतील आणि राज्यातील वातावरण अस्वस्थ असेल आणि त्या राज्य संवेदनशील असेल, तर अशा परिस्थितीत यात्रा सुरू ठेवणे योग्य नाही.यात्रा अचानक का केली रद्द?आज संध्याकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे जाहीर केले.
याचबरोबर ”अनेक लोक मला भेटत असतात, परंतु मागील चार दिवसांपासून मी कोणताही फोन घेऊ शकलो नाही. कारण, ज्या गावात जातोय तिथे लोक आपल्या अडचणी घेऊन आले आहेत. प्रश्न एवढाच आहे की आमचा जो स्वाभिमानी महाराष्ट्र आहे. तो सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. तो अशांत हे पटत नाही. अशांत हा युवांमुळे, युवांच्या अडचणींमुळे आहे. त्या अडचणी सुटाव्यात अशी भूमिका आमच्या सगळ्यांची आहे.” असंही रोहित पवार म्हणाले.
दरम्यान पंतप्रधानांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री अथवा मुख्यमंत्री यांनी मराठा आरक्षणावर काहीही बोलले नाहीत या पत्रकारांच्या एका प्रश्नावर ते म्हणाले, मुळात राज्य पेटले असताना तिकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदी मिळणार यात गर्क आहेत हे अतिशय दुर्दैवाचे आहे. मराठा आरक्षणाविषयी हे सरकार खरोखरच गंभीर असेल तर आता राज्य व केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे, नवी संसद दाखवायला तुम्ही विशेष अधिवेशन घेता, मग आता महाराष्ट्र पेटला असताना तुम्ही का अधिवेशन बोलवत नाही? असा सवाल त्यांनी केला.
तर होय मी घाबरलो… याशिवाय ”मी माझी भूमिका इथे सांगितलेली आहे. मी स्वत: मराठा आहे. माझी यात्री मी कशामुळे स्थगित करत आहे, हे मी सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर म्हणत असाल मी घाबरलो का? जर या महाराष्ट्रात युवा आत्महत्या करत असेल, तर होय मी घाबरलो. हा जो स्वाभिमानी, सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. तो जर अशांत असेल तर होय मी घाबरलो. आज जर युवकांना संधी मिळत नसेल, त्यामुळे जर युवक वेगळा कोणता तरी निर्णय घेत असतील, तर होय मी घाबरलो.” असं रोहित पवारांनी सांगितलं.”आज जी परिस्थिती या महाराष्ट्रात बघत आहे, जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, अशा परिस्थितीत तुम्ही जर मला विचारत असाल तर होय मी घाबरलो. कारण ही परिस्थिती महाराष्ट्राच्या आज, उद्यासाठी आणि मुलांच्या भवितव्यासाठी पोषक नाही. अशी एक मराठी माणूस म्हणून आणि महाराष्ट्राचा नागरिक म्हणून माझी भूमिका आहे आणि हा माझा विचार आहे.” अशा शब्दांत रोहित पवारांनी आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली.’महाराष्ट्रात संतांनी एकत्र येऊन लढावं अशी शिकवण आहे. जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्याबाबत राजकारण करु नका. जाती-जातीत तेढ निर्माण करु नये, असे आवाहनही रोहित पवार यांनी केलं.