कोरेगाव भीमा – दिनांक १९ नोव्हेंबर
वढू बुद्रुक (ता.शिरूर) येथील ट्रान्सफॉर्मर जाळला होता यामुळे शेतकरी व नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती.यावेळी येथील स्थानिकांनी याबाबतची पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर यांना कळवले यावर दरेकर यांनी आमदार अशोक पवार यांना नागरिकांची समस्या कळवली असता आमदार अशोक पवार यांनी वीजवितरण महामंडळाचे अधिकारी महाजन साहेब यांना ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करण्याची सूचना केली.
यावर तातडीने एम एस सी बी चे शिक्रापूर उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन, बिराजदार साहेब यांनी तातडीने कार्यवाही करत नागरिकांची समस्या सोडवली. अवघ्या सहा तासात ट्रान्सफॉर्मर दुरुस्त केल्याने नागरिकांनी आमदार अशोक पवार, एम एस सी बीचे अधिकारी कर्मचारी यांचे आभार नागरिकांनी मानले.