Saturday, September 7, 2024
Homeताज्या बातम्याआमदार अशोक पवार यांच्या प्रयत्नांतून सणसवाडी येथील मयुरी रेसिडेन्सीची केबल दुरुस्ती अवघ्या...

आमदार अशोक पवार यांच्या प्रयत्नांतून सणसवाडी येथील मयुरी रेसिडेन्सीची केबल दुरुस्ती अवघ्या सहा 

कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता. शिरूर) येथील. मयूर रेसिडेन्सी मध्ये मोठ्या संख्येने नागरिक वास्तव्यास असून येथील ट्रान्सफॉर्मरची केबल आदर अशोक पवार यांच्या प्रयत्नांनी अवघ्या सहा तासांत बसल्याने नागरिकांनी आमदार अशोक पवार वीज महामंडळाचे अधिकारी यांचे आभार मानले.

सणसवाडी येथील मयूरी रेसिडेन्सी मध्ये ट्रांसफरची केबल जळाल्याने दोन दिवस वीजपुरवठा खंडीत झाल होता .यामुळे गृहिणी, लहान मुले व नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत होते.याबाबत येथील नागरिकांनी पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी संचालक पंडित दरेकर यांना समस्या सांगितली असता दरेकर यांनी आमदार अशोक पवार यांच्याशी तत्काळ संपर्क साधत मयूर रेसिडेन्सी मधील नागरिकांची समस्या कळवली असता आमदार अशोक पवार यांनी तातडीने वीज महामंडळाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधत तातडीने समस्या सोडवण्याबाबत सूचना केली असता अवघ्या  सहा तासात केबल दुरुस्ती करून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आल्याने नागरिकांनी आमदार अशोक पवार, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर, एम एस सी बीचे शिक्रापूर अभियंता नितीन महाजन, अधिकारी सहाय्यक अभियंता बाळासाहेब टेंगळे,ज्ञानेश्वर आहेरकर,जय भामरे, तडवी यांचे आभार मानले.

    यावेळी मयुरी रेसिडेन्सी सोसायटीच्या चेअरमन वंदना पंडित दरेकर चेअरमन, व्हॉईस चेअरमन मंगल शेळके,खजिनदार कोमल ढेकळे, सचिव छाया गादगी, संचालक विभावरी पाटील, छाया चौरे, राहुल नागरे, युवराज शिंदे, बाळासाहेब भोसले, निलेश कदम, अशोक खवले आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!