सणसवाडी (ता. शिरूर) येथील पवार वस्ती संचेती येथील ट्रान्सफार्मर जळाला होता. याबाबत तेथील नागरिकांनी पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर यांना याबाबत समस्या सांगितली असता त्यांनी तात्काळ आमदार अशोक पवार यांच्याशी संपर्क साधून दोन दिवसांपासून पासुन लाईट नसल्याची समस्या सांगितली असता आमदार अशोक पवार यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने ट्रान्सफॉर्मर बसवण्याची सूचना केली.
आमदार अशोक पवार यांना पवार वस्ती संचेती येथील नागरिकांनी ट्रान्सफॉर्मर जळाला असून दोन दिवसांपासून लाईट नसल्याने मोठी गैरसोय होत असल्याचे सांगितले असता आमदार पवार यांनी तातडीने संबंधितांशी संपर्क साधत तातडीने ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या सूचना केली असता अवघ्या १२ तासात नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला. कार्यकारी अभियंता संदिप दरवडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता किशोर शिंदे व नितीन महाजन यांनी सहकार्य केले. तातडीने ट्रान्सफॉर्मर बदलल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त व्यक्त करत आमदार अशोक पवार, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर व स्थानिक पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.