कोरेगाव भीमा – सणसवाडी ( ता.शिरूर) येथील पाझर तलावास आमदार अशोक पवार यांच्या प्रयत्नाने पाणी सोडण्यात आले असून यामुळे सणसवाडी येथील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय टळणार असल्याची माहितीही पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर यांनी दिली.
याबाबत सरपंच सुवर्णा रामदास दरेकर, उपसरपंच दत्तात्रय हरगुडे व ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थांनी आमदार अशोक पवार यांच्याकडे पाण्याची मागणी केली होती.
मागील काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला होता. नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होईल असा पाऊस न झाल्याने नागरिकांना पाण्याचा प्रश्न पडला होता पण सणसवाडी करांसाठी आमदार अशोक पवार यांनी प्रयत्न करत पाझर तलावात पाण्याची व्यवस्था झाल्याने पाण्याचे संकट टळले आहे.
सणसवाडी येथे पाझर तलावात पाणी आले त्यावेळी माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर, शेतकरी रतन हरगुडे ,सुनील हरगुडे ,प्रा.अनिल गोटे उपस्थित होते.