पुणे – जिल्हा नियोजन समिती २०२२ – २३ अंतर्गत आमदार अशोक पवार यांनी शिरूर – हवेली मतदार संघासाठी भरघोस निधी मिळवला असून तब्बल ३३ कोटी रुपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली आहे.
शिरूर – हवेली मतदार संघात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण विकासकामांसाठी आमदार अशोक पवार प्रयत्नशील असतात.येथील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचवावा , सर्व सुख सुविधा उपलब्ध होण्यासाठी नेहमीच प्रयत्न करणाऱ्या आमदार पवार यांनी पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ३३ कोटी रुपयांचा निधी आणला असून यामाध्यमातून मतदार संघातील विविध विकासकामांना चालना देण्यात आली आहे.तसेच ग्रामीण भागातील विकासाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आला असून याचा फायदा ग्रामीण भागाला होणार आहे.आमदार अशोक पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शिरूर हवेली मतदार संघातील मी रस्ता, शाळा दुरुस्ती,शाळा कंपाऊंड, स्मशानभूमी दुरुस्ती अशा विकास कामांची तरतूद केली आहे.