कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) ते पिंपळे जगताप, सणसवाडी ते वढू बुद्रुक , फेबर कंपनी, एल अँड टी फाटा ते तळेगाव ढमढेरे, कासरी ते धायारकर वस्ती ते तळेगाव ढमढेरे रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या सुचना येथील आमदार अशोक पवार यांच्याकडे नागरिकांच्या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या यावेळी आमदार पवार यांनी संबधित विभागांना पत्रव्यवहार करत तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याचा सूचना केल्या यावर संबधित विभागांनी तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले.
पिंपळे जगताप व तळेगाव ढमढेरे येथे शेतकऱ्यांना शेती माल नेण्यासाठी त्रास होत होता त्यामुळे शेतीमालाचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. आमदार अशोक पवार यांच्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती होत असल्याने नागरिकांनी मोठ्या प्रकावर आनंद व्यक्त करत आमदार पवार यांचे आभार मानले. फोटो