कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील युवकावर आमदार अशोक पवार यांनी सोपवली शिरूर तालुका सर्जचइतनिस पदाची जबाबदारी
कोरेगाव भिमा – वाडा पुनर्वसन (ता.शिरूर) येथील सर्वसामान्य कुटुंबातील व कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातील युवक प्रकाश बाबर यांची आमदार अशोक पवार यांनी शिरूर तालुका चिटणीस पदी नियुक्ती केल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत आमदार अशोक पवार यांच्या सर्वसामान्य नागरिकांना व कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या सर्वसमावेशक भूमिकेबाबत आनंद व समाधान व्यक्त केले.
शिरूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मोलाची भूमिका पार पाडणाऱ्या प्रकाश बाबर यांच्या कामाची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिरूर तालुका चिटणीस पदी निवड करण्यात आल्याचे पत्र आमदार अशोक पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरूर तालुका अध्यक्ष विश्वास ढमढेरे यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी उपस्थित पुणे जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य पंडित दरेकर पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष संभाजीआप्पा फराटे, रावसाहेब दादा साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब भोसले सर,माऊलीआबा थेऊरकर माजी सरपंच नवनाथ माळी, अशोक ढेरंगे, निलेश दरेकर, सागर गव्हाणे व अन्य मान्यवर उपस्थित होते
आमदार अशोक पवार यांनी मोठ्या विश्वासाने पद दिले आहे तो विश्वास सार्थ ठरवत पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची सेवा करत पक्षाचा विचार व आमदार अशोक पवार यांची विकास कामे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्वसमावेशक विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करणार आहे. – प्रकाश बाबर, नवनियुक्त चिटणीस शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी