माहेर संस्थेच्या वतीने ऊस तोड मजुरांना सस्नेह भोजन व चादरीचे वाटप करत मानवतेचे अनोखे दर्शन
कोरेगाव भीमा – वढू बुद्रुक ( ता.शिरूर) येथील माहेर संस्थेच्या ख्रिसमस सणाच्या निमित्त वतीने सहाशे ऊस तोड मजूर ,बांधकाम मजूर व रस्त्याचे काम करणारे काम करणारे मजूर स्नेह भोजनाचा व मजुरांच्या कुटुंबाला थंडीत झोपदुत्वजो थंडीचा सामना करावा लागत आहे त्यासाठी त्यांना मायेची उन देण्यासाठी चादर वाटप करण्यात येऊन अनोखा मानवतेचा सोहळा पार पडला.
ज्या लोकांच्या आयुष्यात दुःख आहे त्यांना आनंदाचा क्षण , पोटभर मिष्टान्न भोजन व थंडीत त्यांना ऊब मिळावी म्हणून मुलांसाठी चादर देण्याचा व त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी या माणुसकी धर्माचे पालन करणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मजूर बांधवांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात येऊन कष्टकऱ्यांच्या त्यागाचा अनोखा सन्मान करत माणुसकीचे उद्द
येशू ख्रिस्तांच्या जन्माचे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी येशू ख्रिस्त यांच्या जन्माचे मेणबत्ती हातात घेऊन स्वागत फादर अँग्नोलो, फादर जॉन, संस्थापक संचालक ल्युसी कुरियन व लहान मुलांनी उस्याहात येशू जन्माचे स्वागत केले.
माहेर संस्थेच्या संस्थापक संचालक ल्युसी कुरियन दीदी,माहेरच्या विश्वस्त निकोला पवार,संचालक योगेश भोर, फादर अँग्नोलो, फादर जॉन , सिस्टर अँजोला, एस्को, माहेरच्या अध्यक्षा हिराबेगम मुल्ला,माजी ग्राम पंचायत सदस्य संजय भंडारे, आनंद सागर ,प्रकाश कोठावळे, रमेश दुतोंडे,हरीश अवचार, रमेश चौधरी, मिनी एम जे, प्रशांत गायकवाड, संजय इंगळे,सुमित इंगळे, विजय तवर, निता सूर्यवंशी ,संगीता चौधरी उपस्थित होते.