एका विचारात काम करत असताना पक्ष बदलला असं काहीच नसतं
शिरूर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ अमोल कोल्हे यांना खोचक तिला लगावला असून आढळरावांपेक्षा अमोल कोल्हे एका गोष्टीत सरस आहेत. आढळराव नाटककार नाहीत. ते खूप नाटकी आहेत. त्यांना नाटक जमतं, रडता येतं, हसता येतं आणि चुगलेबाजीही करता येते. पण एक लक्षात ठेवा की, लोकं नाटकाचं तिकीट घेऊन एकदा नाटक पाहायला जातात. पण नाटक जर फ्लॉप निघालं तर परत कुणीही नाटक पाहायला जात नाहीत,” असा खोचक टोला त्यांनी शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरूर मधील पंच कंदील चौकातील सभेत लगावला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आढळराव पाटील यांनी पक्ष बदलला नाही. जागावाटपात शिरुरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली. पण मी त्यावेळी म्हटलं की, जागा जरी राष्ट्रवादीच्या कोट्यात गेली तरी उमेदवार म्हणून आपण आढळराव पाटलांनाच देऊ. त्यामुळे त्यांनी पक्ष बदललेला नाही. आम्ही तिघेही एका विचाराने सोबत आलो आहोत.
“मागच्या वेळी पालघरमध्ये उद्धव ठाकरेंनी आम्हाला जागा आणि उमेदवार दोन्ही द्या असं म्हटलं. आमच्या खासदाराला आम्ही उद्धव ठाकरेंना दिलं आणि पुन्हा तिथून निवडून आणलं. त्यामुळे एका विचारात काम करत असताना पक्ष बदलला असं काहीच नसतं. समोरच्या उमेदवाराने किती वेळा निष्ठा बदलल्या आणि गेल्या ५ वर्षात कितीवेळा फेसबूक पोस्ट टाकल्या हे त्यांना विचारावं. ते कुठे कुठे जाणार होते आणि कसे थांबले याबद्दलचं सत्य आम्ही सांगितलं तर त्यांचा चेहरा उघड होईल. पण आढळरावांपेक्षा ते एका गोष्टीत सरस आहेत. आढळराव नाटककार नाहीत. ते खूप नाटकी आहेत. त्यांना नाटक जमतं, रडता येतं, हसता येतं आणि चुगलेबाजीही करता येते. पण एक लक्षात ठेवा की, लोकं नाटकाचं तिकीट घेऊन एकदा नाटक पाहायला जातात. पण नाटक जर फ्लॉप निघालं तर परत कुणीही नाटक पाहायला जात नाहीत,” असा खोचक टोला त्यांनी लगावला.