अळकुटी – पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अळकुटी या महाविद्यालयाने नेहमीच उत्तमोत्तम प्रगती साध्य केली आहे. ग्रामीण भागातील एक आदर्श महाविद्यालय म्हणून अळकुटी महाविद्यालय नावारूपास आलेले आहे. या महाविद्यालयास बंगलोर येथील नॅक मूल्यांकन समितीने दि.२३ व २४ जानेवारी २०२४ रोजी भेट दिली. या अहवालाचे मूल्यमापन करून बंगलोर येथील नॅक समितीने अळकुटी महाविद्यालयास २.७८ सिजीपीए देत B++ ही श्रेणी बहाल केली आहे.
यावेळी प्रोफेसर डी. एस. नेगी- चेअरमन, प्र-कुलगुरू एच. एन. बी. गरवाल युनिव्हर्सिटी उत्तराखंड, प्रोफेसर क्षमा अगरवाल-मेंबर कोऑर्डिनेटर, राजस्थान विद्यापीठ, डॉ. रूपरेखा बोर्डोलोई- मेंबर, प्राचार्य- काकोजन कॉलेज, आसाम हे नॅक समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते. या नॅक समितीने दोन दिवस या महाविद्यालयाची पाहणी व पडताळणी केली. नॅक समितीने या भेटीचा अहवाल बंगलोर येथील नॅक कार्यालयास सुपूर्द केला. या अहवालाचे मूल्यमापन करून बंगलोर येथील नॅक समितीने अळकुटी महाविद्यालयास २.७८ सिजीपीए देत B++ ही श्रेणी बहाल केली आहे. एकूणच संपूर्ण महाराष्ट्रात विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये B++ श्रेणी मिळविणारे महाविद्यालय म्हणून अळकुटी महाविद्यालयाचा अग्रक्रम लागतो.
या अळकुटी महाविद्यालयाच्या मूल्यांकनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे महसूल व पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास मंत्री डॉ. राधाकृष्णजी विखे पाटील यांनी महाविद्यालयाच्या वाटचालीस शुभेच्छा देत , अळकुटी महाविद्यालयाने शिक्षणाची गंगोत्री तळागाळापर्यंत पोहोचविली आहे व या मूल्यांकनानंतर महाविद्यालयाने उत्तम यश संपादन करत महाविद्यालयच्या शिरपेचात एक मानाचा तुरा निश्चित खोवला आहे. यानिमित्त अहमदनगर जिल्ह्याच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील तसेच अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही महाविद्यालयाच्या कामगिरीचे कौतुक करून मनस्वी शुभेच्छा दिल्या.
या मूल्यांकनाप्रसंगी प्रवरा संस्थेचे सेक्रेटरी पदाधिकारी भारत घोगरे , माजी पंचायत समिती सदस्य डॉ. भास्करराव शिरोळे, निघोज- अळकुटी जिल्हा परिषद गटाचे नेते सचिन वराळ, पाडळी आळेचे माजी सरपंच शभाऊसाहेब डेरे, संग्राम पावडे, संस्थेचे सुपरीटेण्डेण्ट डॉ. शिवानंद हिरेमठ सर, डॉ. महेश खर्डे- नॅक मेण्टॉर, प्रवरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम पवार, शेगावकर सर, संस्थेतील विविध विभागांचे पदाधिकारी यांचे बहुमोल सहकार्य लाभले. तसेच या सर्वांनी प्राचार्य डॉ. शरद पारखे, तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांचे या मूल्यांकनानिमित्त कौतुक केले.