Friday, November 22, 2024
Homeक्राइमअपघातातील गाडी परत करण्यासाठी दीड लाखांची लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत...

अपघातातील गाडी परत करण्यासाठी दीड लाखांची लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत विभागाने २० हजारांची लाच घेताना पकडले रंगेहाथ

पुणे – अपघातातील जप्त केलेली गाडी परत करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच मागून त्यापैकी ७० हजार रुपये घेतले. तरीही उरलेले पैसे मागणाऱ्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाला २० हजार रुपयांची लाच घेताना सापळा रचून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडण्यात आले.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने चिखली पोलीस ठाण्यात सापळा लावून पहाटे २ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली आहे.नरेंद्र लक्ष्मण राजे (वय ५४) असे या सहायक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. सध्या तो पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील चिखली पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.

याबाबत एका ३२ वर्षाच्या नागरिकाने तक्रार दिली होती. तक्रारदार यांच्या गाडीचा अपघात झाला होता. या अपघाताबाबत चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या अपघातातील गाडी तक्रारदार यांना परत करण्यासाठी नरेंद्र राजे याने दीड लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती १ लाख रुपये देण्याचे ठरले होते. त्यापैकी १३ डिसेंबर रोजी १५ हजार रुपये आणि १५ डिसेबर रोजी ५५ हजार रुपये राजे याने घेतले होते. उरलेल्या रक्कमेची मागणी तो करत होता. तेव्हा तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. 

पुणे एसीबीच्या पथकाने प्राप्त तक्रारीची शनिवारी पडताळणी केली असता सहायक पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र राजे यांनी ७० हजार रुपये लाच स्वीकारून २० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. एसीबीच्या पथकाने रविवारी चिखली पोलीस ठाण्यात सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना नरेंद्र राजे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. नरेंद्र राजे यांच्यावर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस शिपाई भूषण ठाकूर, सुराडकर, हवालदार चव्हाण यांनी ही कारवाई केली.

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपणास कोणी शासकीय अधिकारी / कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.कार्यालय क्र. 020 26132802 ईमेल dyspacbpune@gmail.com

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!