अनवाणी दत्तात्रय वाबळे गुरुजी पायात पुन्हा घालणार वाबळेवाडीतच चप्पल
पुणे : पुणे जिल्ह्यातील पहिली डिजीटल शाळा व राज्यात प्रसिद्ध असलेली वाबळेवाडी शाळा, या शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपातून त्यांना पुणे जिल्हा परिषदेने दोषमुक्त केले आहे. त्यांच्यावर करण्यात आलेले कुठलेही आरोप सिद्ध न झाल्याचा स्पष्ट अहवालच विभागीय चौकशी समितीने जिल्हा परिषदेला सादर केल्यानंतर पुणे जिल्हा परिषदेचे विशेष कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी दोषमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून वारे यांची चौकशी सुरु होती. याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadanvis) ,उपमुख्यमंत्री अजित पवार ( (DCM Ajit Pawar), माजी मंत्री व आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu)यांनी देखील सरकारला जाब विचारला होता. त्यानंतर विभागीय चौकशी समिती नेमण्यात आली होती. या संपूर्ण चौकशीत वारे यांच्यावर झालेले हलगर्जीपणा, कर्तव्यात कसूर आणि प्रशासकीय कामात निष्काळजीपणा असे कोणतेही आरोप सिद्ध होत नसल्याचे समितीने लेखी स्वरूपात कळवले. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी वारे गुरुजींना सर्व आरोपातून दोषमुक्त करीत निलंबन कालावधी सेवाकाळ गृहीतधरत असल्याचा आदेश नुकताच जारी करुन तो वारे यांना समक्ष वारे सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणी जालिंदरनगर येथे त्यांना देण्यात आला आहे.