Wednesday, November 20, 2024
Homeताज्या बातम्या १८ किलोमिटर चालताना पूर्ण दिवस अन्नत्याग करत रोहित पवार यांचे मराठा आरक्षण...

 १८ किलोमिटर चालताना पूर्ण दिवस अन्नत्याग करत रोहित पवार यांचे मराठा आरक्षण व जरांगे पाटलांना समर्थन

सणसवाडी येथील कॉर्नर सभेत आमदार रोहित पवार 

कोरेगाव भीमा – सणसवाडी ( ता.शिरूर) येथे युवा संघर्ष यात्रा निमित्त आमदार रोहित पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला रोहित पवार यांचा पाठिंबा; एक दिवस अन्नत्याग करणार असून पूर्ण दिवस अन्नाचा एक कनही खाणार नसल्याचे सांगत मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे.मराठी माणसं कधीच हार मनात स्वाभिमानी महाराष्ट्राची मराठी माणसं आहोत आम्ही लढा देत राहू असे म्हणत मराठा समाजाला १६ तक्के आरक्षण का देऊ शकत नाही असा राज्यसरकारला प्रश्न विचारला.

    तरुणांना रोजगार मिळावा, शेतकऱ्यांचे हित जपावे, युवक दहा दहा वर्षे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्या हाताला काम मिळावे या अनेक विषयांना आमदार रोहित पवार यांनी स्पर्श करत युवकांच्या व उपस्थितांच्या मनाचा ठाव घेत सरकारवर शाब्दिक प्रहार  केला.

   यापुढे  आमदार रोहित पवार यांनी ” युवा संघर्ष यात्रेचा पहिला दिवस दिवस आशीर्वाद दिवस होता. यात्रेचा पहिला दिवस श्रीक्षेत्र तुळापूर, वढू बुद्रुक येथे नतमस्तक होऊन लढण्याची प्रेरणा घेत सामान्य लोकांचे हित म्हणजे स्वराज्य जपले.पहिली कॉर्नर सभा  सणसवाडी येथे होत आहे याचा अभिमान आहे. लोक यांनी अनमोल सहकार्य केले आहे. या देशात लोकशाही टिकावी यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहे.असे मत व्यक्त केल 

          यापुढे रोहित पवार यांनी युवा वर्गाच्या दबावामुळे काँट्रॅक्ट भरती जी आर मागे घेतला, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होण्याचे स्वप्न भंग होऊ नये, एम आय डी सी आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत,शेतकरी वर्गाला सुखावण्याचे प्रयत्न व्हायला हवेत, युरिया विकत घेताना एक लाख रुपयांचे लिकिंग करावे लागते,  सरकारला दारूची समिती बनवायची आहे, मराठी माणसं कधीच हार मनात स्वाभिमानी महाराष्ट्राची मराठी माणसं आहोत असे मत व्यक्आमदार रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रा सणसवाडी येथे मुक्कामात ग्रामीण भागातील युवा वर्गाशी साधला संवाद.

    सणसवाडी (ता.शिरूर) येथे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचे उत्साहाच्या जल्लोषाच्या वातावरणात स्वागत करण्यात आले.यावेळी त्यांच्यावर फुलांची उधळण तलकरत वाद्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

     यावेळी आमदार रोहित पवार यांचे पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर यांनी स्वागत केले यावेळी राष्ट्रवादी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम,राष्ट्रवादीचे विकास लवांडे, संचालक विश्वास ढमढेरे, राष्ट्रवादी युवक पुणे जिल्हाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दत्तात्रय हरगुडे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैभव यादव व इतर मान्यवर उपस्थित होते.

 आमदार रोहित पवार यांच्या हस्ते ग्राम दैवत भैरवनाथ महाराजांची सायंकाळी आरती करण्यात आली तर आमदार रोहित पवार यांनी युवकांच्या प्रश्नावर अभ्यासू भाषण करत उपस्थितांची मने जिंकली यावेळी दरेकरवाडी,धानोरे,शेरी, पिंपळे जगताप, वढू बुद्रुक येथील युव वर्ग त्यांना भेटण्यासाठी व त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी मोठ्या संख्येने आला होता.

सणसवाडी गावच्या वतीने भाषणे सरपंच सुवर्णा दरेकर, उपसरपंच दत्तात्रय हरगुडे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दरेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष दत्तात्रय हरगुडे, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष वैभव यादव यांची भाषणे झाली

 यावेळी उपस्थितांना सन्मान पुणे जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य पंडित दरेकर , राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर तालुका  उपाध्यक्ष दत्तात्रय हरगुडे  सणसवाडी गावच्या सरपंच सुवर्णा दरेकर उपसरपंच दत्तात्रय हरगुडे काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष वैभव यादव ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दरेकर अक्षय कानडे,माजी सरपंच व  ग्रामपंचायत सदस्या संगिता हरगुडे, शशिकला सातपुते, ललिता दरेकर,रुपाली दरेकर, तनुजा दरेकर,सुनीता दरेकर,वंदना दरेकर, माजी चेअरमन सुहास दरेकर , माजी उपसरपंच गणेश दरेकर,बुबशा दरेकर,गोरक भुजबळ, निलेश दरेकर, ,काळुराम दरेकर, दगडू दरेकर, नवनाथ हरगुडे, सुभाष दरेकर, विठ्ठल दरेकर,संतोष शेळके,व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

शरद पवार यांच्या धोरणामुळे सणसवाडी येथे औद्योगिकीकरण – सणसवाडी  भागात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी  डी झोन आणल्यामुळे येथे अनेक उद्योग व्यवसाय उभे राहिले.चासकमान , डिंभे धरणामुळे विकास झाला.८२ वर्षांचे असताना महाराष्ट्र हित जपत आहे.त्यांच्यामुळे आम्हाला विविध विषयांची माहिती मिळते असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.

    कामगार,भूमिपुत्र यांच्या अडचणींवर चर्चा होत आहे. विधानसभेत आवाज उठवला जात आहे. असे मत व्यक्त करत शरद पवार यांच्या कार्याचे कौतुक केले.

सणसवाडी येथे डी झोन आणला तसेच येथे उद्योग व्यवसाय उभा केला. इस्पात सारखी मोठी कंपनी आणली. राज्यातील सर्वात मोठा दुष्काळी असणाऱ्या शिरूर तालुक्यात देशातील व राज्यातील मोठ्या संख्येने कामगार येत आहेत.हे शरद पवार साहेबांच्यामुळे या भागाचा विकास झाला. या भागात चासकमान व डिंभे धरणामुळे विकास झाला आहे या भागातील जनता शरद पवार साहेब व आमदार अशोक पवार यांच्यामागे उभी असून येथील जनता पवार साहेबांच्या मागे ठामपणे उभे राहणार असल्याची ग्वाही  उपाध्यक्ष दत्तात्रय हरगुडे व उपस्थितांनी दिली.

सणसवाडी ग्राम पंचायतीचे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते.येथील औद्योगिक विकास त्यांच्या धोरणामुळे मोठ्या प्रमाणात झाला सून पूर्वी सणसवाडी येथील घरातील एक व्यक्ती मुंबई येथे कामाला जायचा आता मात्र देशासह राज्यातील कानाकोपऱ्यातील माणसे येथे कामाला येथे येतात ही प्रगती खरेतर शरद पवार यांच्यामुळे झाली असल्याची आहे.- पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!