Wednesday, November 20, 2024
Homeसाहित्य/सामाजिक" स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हडपसर पोलीस स्टेशन येथे " कॉमन मॅन वॉल...

” स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हडपसर पोलीस स्टेशन येथे ” कॉमन मॅन वॉल ” चे अनावरण

कॉमन मॅन वॉल ” चे अनावरण पोलीस स्टेशनची मागील ११ वर्षापासून स्वच्छता करणाऱ्या सफाई सेविका सुनंदा प्रशांत जांभुळकर यांचे हस्ते अनावरण.

कॉमन मॅन वॉल ” ची लांबी २६ फुट व उंची ११ फुट.

जगप्रसिध्द व्यंग चित्रकार आर . के . लक्ष्मण यांच्या ” कॉमन मॅन बॉल ” आणि पोलीस यांचे गळा भेटीचे थ्री – डी प्रकाश चित्र

हडपसर – हडपसर दिनांक १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या ( आझादीच्या अमृतमहोत्सव ) हडपसर पोलीस स्टेशन येथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात ध्वजवंदन संपन्न झाले . यावेळी कॉमन मॅन वॉलचे अनावरण करण्यात आले. ध्वजवंदनानंतर पोलीस स्टेशन समोरील दर्शनी भागात उभारण्यात आलेल्या ” कॉमन मॅन वॉल ” चे अनावरण पोलीस स्टेशनची मागील ११ वर्षापासून स्वच्छता करणाऱ्या सफाई सेविका सुनंदा प्रशांत जांभुळकर यांचे हस्ते करण्यात आले .

” कॉमन मॅन वॉल ” ची लांबी २६ फुट व उंची ११ फुट असुन त्यावर जगप्रसिध्द व्यंग चित्रकार आर . के . लक्ष्मण यांच्या ” कॉमन मॅन बॉल ” आणि पोलीस यांचे गळा भेटीचे थ्री – डी प्रकाश चित्र तयार करण्यात आले आहे . हडपसर पोलीस स्टेशन हे कायमच सर्वसामान्य व्यक्तीला केंद्र बिंदु मानुन त्याला मदत करण्यासाठी सामन्यावरील अन्याय दूर करणेसाठी कायमच तत्पर असणार आहे अशी भुमिका हडपसर पोलीस स्टेशन अधिकारी व अमंलदार यांची आहे .

” कॉमन मॅन वॉल ” उभारणी आणि उद्घाटन ही संकल्पना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांची असुन ही भिंत हडपसर पोलीस स्टेशनच्या प्रवेशव्दाराचे दर्शनी भागी उभारण्यात आली आहे . सदर भिंत उभारण्यासाठी नगरसेवक आनंद आलकुंटे , शिवराज घुले , संजय हरपळे , नगरसेवक गणेश ढोरे , उल्हास शेवाळे , अँमनोरा संचालक सुनिल तरटे या हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पक्षीय नेत्यानी वस्तु रुपाने आपले योगदान दिले . तसेच सदर भिंतीच्या कामामुळे पोलीस स्टेशन प्रांगणातील खराब झालेल्या पेव्हींग ब्लॉक योगेश पासलकर यांनी नव्याने बदलुन दिले . हडपसर पोलीस स्टेशनच्या वतीने वरील योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचा पुष्प गुच्छ देवून सत्कार करण्यात आला .

” कॉमन मॅन वॉल ” उभारणीसाठी पोलीस स्टेशनच्या वतीने सहाय्यक पोलीस उप निरीक्षक दिनेश शिंदे , पोलीस हवालदार राहुल मोकाशी , सिध्देश्वर पळसे , पोलीस नाईक सुनिल हानवते , अमोल मर्कराज , समीर पांडुळे , पोलीस अमंलदार उमेश शेलार यांनी विशेष परिश्रम घेतले . ध्वजवंदन आणि कॉमन मॅन वॉल चे अनावरण झालेनंतर हडपसर येथील ताल गर्जना वाद्यपथकाने शानदार ढोल लेझीम वादनाचे प्रात्यक्षिक दिले . काही महीन्यापुर्वी आमदार चेतन तुपे यांच्यासह स्थानिक नागरीकांच्या सहयोगाने हडपसर पोलीस स्टेशन कडील अधिकारी व अमंलदारांनी माळवाडी स्मशानभुमी जवळील शासकीय जागेत स्थलांतरीत हडपसर पोलीस चौकीचे निर्माण केले आहे

सदर कार्यक्रमासाठी हडपसर पोलस स्टेशन कडील सर्व अधिकारी व अमंलदार तसेच परिसरातील सर्व पक्षीय नेते , शाळांचे विदयार्थी , स्पर्धा परीक्षांकचे विद्यार्थी , निवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार , नागरीक आणि तालगर्जना वादयपथक हडपसर असे ८०० ते १००० लोक उपस्थित होते .

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!