Wednesday, November 20, 2024
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रस्वराज्यरक्षक श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाला निधी देत गती द्यावी -...

स्वराज्यरक्षक श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाला निधी देत गती द्यावी – आमदार अशोक पवार

विधानसभेत आमदार अशोक पवार यांनी स्मारकाबाबत विधानसभेत केली मागणी

कोरेगाव भीमा – स्वराज्यरक्षक श्री छत्रपती संभाजीमहाराज यांचे जागतिक दर्जाचे स्मारक वढू बुद्रुक ( ता.शिरूर) व तुळापूर ( ता.हवेली) येथे उभारण्यात येत असताना नवीन सरकारच्या बजेटमध्ये त्याबाबतची तरतूद करण्यात आलेली नसल्याने याबाबत तरतूद करत जिल्हाधिकारी यांच्याकडील विकास आराखड्यास गती देण्याच्या सूचना करण्याची शिरूर – हवेलीचे मागणी आमदार अशोक पवार यांनी विधानसभेत केली आहे .

विधानसभेत स्वराज्य रक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज स्मारकाविषयी बोलताना आमदार अशोक पा

स्वराज्यरक्षक श्री छत्रपती संभाजीमहाराज यांची समाधी असणारे स्थान महाराष्ट्राची असलेल्या स्मृतिस्थान व प्रेरणास्थान असलेल्या स्वराज्यरक्षक श्री छत्रपती संभाजीमहाराज यांचे स्मारक व्हावे , अशी सर्व जनतेची इच्छा असताना वढू बुद्रुक ( ता . शिरूर , व तुळापूर , ता . हवेली ) येथे श्री छत्रपती संभाजीमहाराज यांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभे करण्याची घोषणा मागील वर्षी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती , त्यावेळी विधानसभेतील सर्व सदस्यांनी त्याला मंजुरी दिली होती , सुमारे दोनशे सत्तर कोटींच्या विकास प्रशासकीय आराखड्याला मान्यतादेखील देण्यात आली आहे . मात्र सत्तांतर झाल्यानंतर नवीन सरकारने काही कामांना स्थगिती दिलेली श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या विकास आराखड्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीमहाराजांच्या स्मारकाला आम्ही अडवले नसून त्याला निधी देणार असल्याचे माध्यमांसमोर सांगितले , तसेच स्वराज्यरक्षक श्री छत्रपती संभाजीमहाराज यांच्या जागतिक दर्जाच्या होणाऱ्या स्मारकाला मार्च २०२५ पूर्वी पूर्णत्वास नेणार असल्याचे शासनाने सांगितले , परंतु नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात मंजूर बजेटमध्ये त्याबाबत तरतूद करण्यात आलेली नसल्यामुळे आपण त्याला मंजुरी देत ते काम मार्गी लावावे, तसेच जिल्हाधिकारी पुणे यांनी या स्मारकाबाबतचा विकास आराखडा हाती घेतला असून त्याला गती देण्याच्या सूचना कराव्यात , अशी मागणी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली .

आमदार अशोक पवार यांनी यापूर्वीदेखील विधानसभेत अनेक प्रश्न मांडून ते मार्गी लावलेले आहेत , हॉस्पिटल व आरोग्याचे प्रश्न, रेशन वितरण व्यवस्था बायो मेट्रिक करणे असे अनेक पथदर्शी कामे करत मतदारसंघाचा विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ते नागरिकांच्या हिताचे निर्णय घेत असतात, प्रत्येक प्रश्नाचा बारकाईने अभ्यास व विकासकामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करतात हे कौतुकास्पद व अनुकरणीय असून राज्य सरकारने स्वराज्यरक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम विकास निधी उपलब्ध करून देत तातडीने पूर्ण करावे असे पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर व वढू बुद्रुकचे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांनी सांगितले .

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!