Wednesday, November 20, 2024
Homeताज्या बातम्यासणसवाडी येथे प्रथमच सरपंच करंडक फुल पिच क्रिकेट स्पर्धेचे भव्यदिव्य आयोजन

सणसवाडी येथे प्रथमच सरपंच करंडक फुल पिच क्रिकेट स्पर्धेचे भव्यदिव्य आयोजन

सणसवाडी गावातील सहा वॉर्डातील सहा संघ घेणार सहभाग तर बक्षिसांचा वर्षाव ,पर्यावरण पूरक व आरोग्याच्या सुदृढतेसाठी बक्षिसामध्ये  सायकल वाटप

कोरेगाव भिमा – उद्योगनगरी सणसवाडी (ता.शिरूर) येथे सरपंच सुवर्णा रामदास दरेकर यांच्या विद्यमानाने व सणसवाडी फायटर्स यांच्या आयोजनाने पर्यावरणपूरक व आरोग्यवर्धक बक्षिसे ठेवत भव्यदिव्य अशा सरपंच करंडक २०२३ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

   उद्योगनगरी सणसवाडी ग्रामस्थ विकासाचा आलेख उंचावत ठेवताना विविध क्षेत्रातील कलागुणांना वाव देण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात.येथे शालेय गुणवत्ता वाढ असो की सरपंच आपल्या दारी उपक्रम, सौर उर्जेवर चालणारे पथदिवे असो की ग्रामपंचायतीचे कार्यालय तसेच व्यायामशाळा अशा विविध विकासकामांच्या बाबतीत अग्रेसर असणारी उद्योगनगरी सणसवाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थ नावलौकिक वाढवत असतात.

        २७ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर अशी चार दिवस  सनग्लो क्रिकेट स्टेडियम येथे स्पर्धा पार पडणार असून नामांकित व अनुभवी पंच व कोमेट्री करण्यासाठी स्पर्धेसाठी उपस्थित राहणार आहे. 

या स्पर्धेसाठी मंगल मूर्ती डेव्हलपर्सचे व  माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांच्याकडून ३१ हजारांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस, सणसवाडीचे माजी सरपंच युवराज दरेकर यांच्याकडून २१ हजारांचे द्वितीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले असून युट्यूब लाईव्ह माजी सरपंच बाबासाहेब दरेकर, माजी चेअरमन सुहास दरेकर, अतिष दरेकर ,क्रिकेट साहित्य साई इंटरप्रायजेसचे नवनाथ दरेकर, अर्धशतक करणाऱ्या प्रत्येक खेळाडूस स्मार्ट वॉच संजय दरेकर, प्रत्येक मॅन ऑफ द मॅच(ट्रॉफी) निखिल दरेकर, मालिकावीर (सायकल) अमोल हरगुडे, अंतिम सामना  समनाविर ( सायकल) विजय दरेकर, बेस्ट गोलंदाज ( सायकल) ॲड श्रीधर हरगुडे, बेस्ट फलंदाज (सायकल) विकास दरेकर, लकी ड्रॉ (सायकल) सचिन हरगुडे, उदयनमुख खेळाडू ( सायकल) महादेव हरगुडे यांच्याकडून बक्षिसे देण्यात आली आहेत तर धानोरे येथील उपसरपंच संतोष भोसुरे,उद्योजक विजय हरगुडे,नवनाथ गव्हाणे ,संतोष दरेकर यांच्या वतीने गॅलरी देण्यात आली आहे.

स्पर्धेची वैशिष्ट्ये–गावातील ६ वॉर्ड चे ६ संघ, -प्रथमच वैयक्तिक ६ सायकल बक्षिसे,-लाईव्ह युट्युब साठी प्रथमच ४ के स्ट्रीमिंग,-लकी ड्रॉ साठी सायकल

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!