कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथील वसे वाडी प्राथमिक शाळेतील सई सुरेश नितनवरे व प्रशांत गौतम संकपाळ या दोन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयात निवड झाल्याची माहिती मुख्याध्यापक संतोष गोसावी यांनी दिली.
नवोदय परीक्षेची तयारी ही ग्रामीण भागातील विद्यार्थी,पालक व शिक्षक यांच्यासाठी आव्हान यासाठी सर्वजण रात्रंदिवस कष्ट घेत विद्यार्थी आपल्या बुद्धिमत्तेची तल्लखता मिळवत आहेअसून ग्रामीण भागातील विद्यार्थि बुद्धिमत्ता, गणित आणि भाषा या तीन विषयांची १०० गुणांची परीक्षा घेऊन सी बी एस सी च्या अंतर्गत निवड झालेल्या ४० टक्के मुले व ४० टक्के मुली अशी सहावी ते बारावीपर्यंत नवोदय विद्यालयात शिक्षण दिले जाते.
यशस्वी विद्यार्थ्यांना रेश्मा वाघुले, प्रतिभा नगरे, धनश्री वडे, शरीफ तांबोळी, या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सणसवाडी ग्राम पंचायतीच्या सरपंच रुपाली दगडू दरेकर, उपसरपंच राजेंद्र दरेकर, माजी उपसरपंच ॲड विजयराज दरेकर, कृषी उत्पन्न समितीचे माजी संचालक दत्तात्रय हरगुडे,पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर, ग्राम पंचायत सदस्य मोहन हरगुडे, उद्योजक दगडू दरेकर, मुख्याध्यापक संतोष गोसावी,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल हरगुडे, उपाध्यक्ष सोनाली पवार, सदस्य निशा धोटे व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचा सन्मान करत अभिनंदनाचा वर्षाव केला.