लग्नातील सत्कार बंद करून शाळा डिजिटल करा , कीर्तने ही काळाची गरज
समाजातील मोठ्या सत्काराच्या प्रथा पाळण्याऐवजी विधायक सामाजिक कार्याने बदल करा. श्राद्ध व इतर शुभ कार्यक्रमाला पेन वह्या वाटप करत गरिबांच्या मुलांचे भविष्य बदला , लग्नातील सत्कार बंद करून शाळा डिजिटल करा,कीर्तने ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केले.
कोरेगाव भीमा – दिनांक २१ जानेवारी
सणसवाडी ( ता.शिरूर) येथील श्री काळूबाई देवी मंदिर देवस्थानाच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन संपन्न झाले. समाजातील मोठ्या सत्काराच्या प्रथा करण्याऐवजी विधायक सामाजिक कार्याने बदल करा. श्राद्ध व इतर शुभ प्रसंगी कार्यक्रमाला पेन वह्या वाटप करत गरिबांच्या मुलांचे भविष्य बदला , लग्नातील सत्कार बंद करून शाळा डिजिटल करा,कीर्तने ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केले.
यावेळी सणसवाडी परिसरातील ग्रामस्थ व नागरिकांनी उत्स्फूर्त गर्दी केली यावेळी महिला भगिनींची व बालकांची उपस्थिती लक्षणीय होती.
पैसा ,स्वार्थ, मान मरातब यासाठी हापापू नका. मुलांच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करा दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि समाजभान मुलांना द्या.जग वरून गोड आहे.जो गुलाल उधळतो त्यानेच निवडणुकीत घात केला. हे लक्षात ठेवा सात्विक अन्न हे निरोगी आयुष्यासाठी महत्त्वाचं आहे.केमिकल युक्त अन्न खाण्यापेक्षा सात्विक अन्न खायला हवें. फवारणी केलेल्या भाज्या खाण्याने आरोग्य खराब होते.
मोबाईलचे व्यसन वाढत आहे मुलांना शारीरिक खेळ खेळू द्या उगाच चुकीच्या सवयी लावून भावी पिढी बरबाद करू नका.दूषित अन्नामुळे समाजात कॅन्सरचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.घरचे अन्न आयुष्य वाढवते.
यावेळी मौनी व शनी अमवस्या निमित्त महाराजांनी एकनाथ महाराजांचा अभंग निरुपणासाठी घेत समाज प्रबोधन केले.
युक्त आहार विहार। नेम ईंद्रियांसी सार । नसावी वासर । निद्रा बहू भाषण ॥ हे संत वचन सांगत सात्विक व चांगल्या आहाराचे महत्व पटवून दिले.
सध्या मुलांच्या हातात वाहने आल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. व्यसनामुळे वडिलांना मुलांना खांदा द्यावा लागणे दुर्दैव आहे.चांगल्या विचारांची संगत ठेवा त्यामुळे आयुष्य दर्जेदार होईल.
राजकारणामुळे नाती दुरावली आहेत. भावकी भवकुत वाद लागले लग्न चोरून जमवाव लागत, गपचुप लागत आहे. भावा बहिणीचे संबंध दुरावले आहेत. निबंधक कार्यालयात नाती तुटली आहेतं एकमेकांची तोंडे पाहत नाही हे बंद करा मेल्यावर सर्व इथेच राहणार आहे.हॉस्पिटल विकत घेणारे कोरोना काळात गेले आहेत.संपत्ती कामाला नाही आली सतकर्म कामाला येणार बंद करून ठेवा.धर्मावर संकट आले तर नेत्याविरहित एक व्हा, धार्मिक द्वेष वाढवणाऱ्या पासून लांब रहा, समाज विघातक शक्ती मोठ्या प्रमाणात द्वेष पसरवत आहेत.
दुसऱ्याची बुटे चाटून नव्हे तर बुटाला पॉलिश करून जगा, स्वाभिमानाने जगा. शर्ट फाटका असला तरी चालेल पण लाचारीने जगू नका. मोठ्याने हसणारी माणसं सज्जन असतात. श्राद्धाला पेन वह्या आणून वाटप करा गरिबांच्या मुलांचे भविष्य बदलेल. लग्नातील सत्कार बंद करून शाळा डिजिटल करा समाजभान जपा लोकांच्या आयुष्याला काहीतरी फायदा होईल असे जगा.
यावेळी निवृत्ती महाराज इंदुरीकार यांना गायक किरण महाराज , सुमटकर महाराज यांनी गायनाची सुंदर साथ केली तर सणसवाडी भजनी मंडळाचे टाळांची उत्तम साथसंगत केली.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री काळूबाई मंदिर देवस्थान , श्री खंडोबा,रुक्मिणी – विठ्ठल ,श्रीराम ,भैरोबा, नरेश्वर मंदिर देवस्थान ,समस्त ग्रामस्थ सणसवाडी व भाविक भक्तांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.