कोरेगाव भीमा – केंदुर ( ता.शिरूर) येथे प्राचार्य अनिल साकोरे यांची स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सरदार रघुनाथराव ढवळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केंदूरच्या प्राचार्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल शिरूर तालुका मुख्याध्यापक संघ तसेच माध्यमिक शिक्षक संघ व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीणच्या वतीने त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनिल सामोरे यांच्या शैक्षणिक कार्याविषयी व सामाजिक उत्तरदायित्व याविषयी गौरवोद्गार व्यक्त करण्यात आले.
शिरूर तालुक्याच्या शैक्षणिक सामाजिक राजकीय धार्मिक विकासात केंदूर नेहमीच अग्रस्थानी असल्याचे मत प्राचार्य तुकाराम बेनके यांनी व्यक्त केले. तसेच पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष रामदास थिटे म्हणाले , ” शैक्षणिक गुणवत्ता व प्रशासन याकरिता मुख्याध्यापकांनी सदैव सजग राहणे गरजेचे आहे .ग्रामीण परिसरांत विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाकरिता विविध स्पर्धा परिक्षांची तयारी , आस्थापना विषयक बाबी , कार्यालयीन व संस्थात्मक कामकाज याकरिता सतत कार्यरत रहाणे आवश्यक आहे . स्व बापुसाहेब थिटे यांनी देशाच्या संसदेत शिरूरचे नेतृत्व केले अनेक आयएएस आयपीएस अधिकारी प्रशासनाला केंदूरच्या भूमीतून मिळाले निश्चितच ही गौरवास्पद बाब आहे. ”
माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सोमनाथ भंडारे यांनी अनिल साकोरे यांच्यात प्रचंड क्षमता आणि ऊर्जा असल्यामुळे निश्चितच ते केंदूरचा शैक्षणिक विकास करण्यासाठी कटीबद्ध राहतील असा आशावाद व्यक्त केला. यानिमित्ताने प्रा. जितेंद्रकुमार थिटे यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीण च्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला मुख्याध्यापक संघाचे सहसचिव रामनाथ इथापे, प्राचार्य एकनाथ चव्हाण, मा उपसरपंच भाऊसाहेब थिटे, ग्रामपंचायत सदस्य मंगेश भालेकर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दशरथ सुक्रे यांनी तर आभार पर्यवेक्षक पाटील यांनी मानले.