Wednesday, November 20, 2024
Homeताज्या बातम्यादेश-विदेशभारतीय राष्ट्रध्वज फडकताना या नियमांचे पालन करा.

भारतीय राष्ट्रध्वज फडकताना या नियमांचे पालन करा.

पुणे – भारतीय स्वातंत्र्याला यावर्षी ७५ वर्षे पूर्ण होत आहे. यंदाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर १३ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जात असतो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत ते “ध्वज संहिता” मध्ये दिले आहेत.केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली असून. ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.या बरोबरच भारताचे सुजाण नागरिक म्हणून आपणही भारतीय राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी तत्पर असायला हवे. प्रत्येक घरावर तिरंगा लावण्यात येणार असला तरी ध्वजसंहितेचे पालन होणेही आवश्यक आहे.

१३ ते १५ ऑगस्ट या दरम्यान नागरिकांनी आपल्या घरावर झेंडा लावावा .

हे करा

घरोघरी तिरंगा या उपक्रमांतर्गत राष्ट्रध्वज फडकविताना हाताने कातलेल्या, विणलेल्या किंवा मशीनद्वारे सुत, पॉलिस्टर, सिल्क, खादी, लोकर,खादीपासून बनविलेल्या कपड्याचा तयार केलेला वापरावा.

राष्ट्रध्वज हा 3:2 या प्रमाणात असावा. केशरी रंग वरच्या बाजुने आणि हिरवा रंग जमिनीच्या बाजुने राहील याप्रमाणे फडकवावा.ध्वज उलटा फडकवला जाणार नाही याची योग्य ती काळजी घेण्यात यावी .

तिरंगा ध्वजाचा आकार आयताकार असावा .

फाटलेला , अर्धा तुटलेला , मळलेला राष्ट्र ध्वज कोणत्याही परिस्थितीत फडकावन्यात येवू नये .

राष्ट्रध्वज उतरवतांना सावधतेने व सन्मानाने उतरवून सुरक्षित ठिकाणी ठेवावा.

राष्ट्रध्वज कोणत्याही पद्धतीने फाटणार नाही याचीकाळजी घ्यावी.

कार्यालयांच्या ठिकाणी ध्वज फडकावल्यास ध्वज संहिता पाळावी . ध्वज सूर्योदयावेळी फडकवावा व सूर्यास्तावेळी उतरवावा .

हे करू नका

राष्ट्रध्वज फाटलेला, मळलेला अथवा चुरगळलेला लावण्यात येऊ नये.

राष्ट्रध्वजावर कोणत्याही प्रकारचे अक्षर किंवा चिन्ह काढू नये.

एकाच वेळी इतर ध्वजासोबत एकाच स्तंभावर किंवा काठीवर राष्ट्रध्वज फडकवू नये.

तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून अन्य कोणत्याही प्रकारचे शोभेसाठी राष्ट्रध्वजाचा उपयोग करु नये.

ध्वज उतरविल्यानंतर त्याची व्यवस्थित घडी घालून तो जतन करून ठेवावा. राष्ट्रीय ध्वज हे राष्ट्राचे स्वाभिमानाचे प्रतीक आहे.त्याचा आदर हा देशप्रेम व्यक्त करत असतो त्यामुळे आपण राष्ट्रध्वजाचा आदर करत त्याचा चुकूनही अवमान होणार नाही यासाठी दक्ष राहायला हवे. याबाबत इतरांना योग्य ते मार्गदर्शन करावे.

अधिक माहितीसाठी राष्ट्रीय ध्वज संहिता.

हे करू नका

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!