संस्थापिका जाई खामकर यांच्या हस्ते ध्वजारोहण
स्वातंत्र्य दिन दिव्यांग विद्यार्थ्यांनी केला मोठ्या उत्साहात साजरा
शिरूर – टाकळी हाजी ( ता.शिरूर) येथील भारतातील पाहिले निवासीदिव्यांग न्यू व्हिजन कला वाणिज्य महाविद्यालय टाकळी हाजी येथे स्वांतत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
दिव्यांग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांसाठी टाकळी हाजी येथील न्यू व्हिजन कला वाणिज्य महाविद्यालय हे जीवन संजीवनी असून यामुळे आयुष्यात स्वाभिमानाने उभे राहता येणार असून आम्हाला येथे आयुष्याला नवीन दृष्टी आणि दिशा मिळाली आहे.आम्ही नक्कीच मोठे ध्येय मिळवण्यात यशस्वी होणार असल्याचे मनोगत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
यावेळी गौरेश धुमाळ व या विद्यार्थ्यांनी देशासाठी त्याग व बलिदान केले त्या हुतात्म्यांना अभिवादन करत आपले मनोगत व्यक्त केले.ज्या समाजात आम्हाला मानाने व सन्मानाने उभे करण्यासाठी जाई खामकर मोठे काम करत आहेत याची जाण ठेवून आम्ही यशस्वी होण्याचा प्रयत्न करू असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी संस्थेच्या संस्थापिका जाई खामकर, संस्थेचे विश्वस्त तुकाराम रासकर , वंदना खामकर, संतोष हजारे, माऊली पवळे, दत्तात्रय डोके, दौलत थोरात,अरुण पोकळे,महाविद्यालयाचे प्राचार्य भाऊसाहेब रवंदळकर , प्राध्यापक दिलीप मुंजाळ , बाळासाहेब इंगळे,सीमा पळसकर,स्वाती पळसकर, वर्षा ढवण, क्लार्क राहुल भाकरे, आशिष कोळसे,अजिंक्य घोडे, कुणाल चव्हाण, संदीप घोडे व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
न्यू व्हिजन कला वाणिज्य महाविद्यालय हे दिव्यांग विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. येथील प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थिनी ही आयुष्यात नक्कीच मोठे धेय्य प्राप्त करणार याची आम्हाला. खात्री आहे. दिव्यांग विद्यार्थी हे विशेष विद्यार्थी आहे यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी समाजाने व शासनाने पुढे यायला हवे.
– संस्थापिका जाई खामकर, न्यू व्हिजन कला वाणिज्य महाविद्यालय
फोटो ओळ ,- न्यू व्हिजन कला वाणिज्य महाविद्यालयाचे ध्वजारोहण करताना संस्थेच्या संस्थापिका जाई खामकर