पुणे – मराठा सेवा संघाचे दुसरे राष्ट्रीय अधिवेशन गुजरात मधील बडोदा शहरात शनिवार दिनांक ९ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. बडोद्याचे समरजीत सिंह गायकवाड यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर उद्घाटन सत्राचे अध्यक्ष राहणार आहेत.
यावेळी राजवर्धन कदमबांडे, खासदार सीआर पाटील, माजी केंद्रीय मंत्री विजय पाटील, आमदार संगीता पाटील, माजी आमदार रेखाताई खेडेकर, डॉक्टर लीना पाटील, माजी आमदार एमजी मुळे, डॉक्टर नरेंद्र पाटील, रणजीत सिंग चव्हाण, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सदर अधिवेशन दिवसभर विविध सत्रात संपन्न होणार आहे सुनील गणदेवीकर मनुष्य व मानवता या विषयावर विचार मांडणार आहेत . चंद्रकांत पाटील हे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जीवन कार्यावर स्लाईड शो व व्याख्यान सादर करणार आहेत. सयाजीराव गायकवाड यांच्या जीवन परिचयाबाबत संजय बच्छाव यांचे व्याख्यान होणार आहे. यावेळी शिवधर्म दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन होणार आहे.
या अधिवेशनात मराठा सेवा संघाचे विभागीय पाच कार्याध्यक्ष सर्व राज्यांचे अध्यक्ष आणि सर्व कक्षांचे अध्यक्ष आपला कार्य अहवाल सादर करणार आहेत यावेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार व राष्ट्रीय सचिव प्रदीप पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत.
देशभरातून दोन हजाराच्या वर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.सदर अधिवेशनाचे प्रमुख आयोजक मराठा सेवा संघ राष्ट्रीय कार्याध्यक्ष पश्चिम भारत डॉक्टर संजय पाटील गुजरात राज्य प्रदेशाध्यक्ष अशोक पवार भाऊसाहेब पवार गिरीश ठाकरे व प्रमुख पदाधिकारी आहेत.
पिंपरी चिंचवड पुणे शहरातून दोनशे पदाधिकारी व कार्यकर्ते अधिवेशनात उपस्थित राहणार आहेत. असे मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष दक्षिण भारत प्रकाश जाधव यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे